संपूर्ण शहराला सुवर्ण-लकाकी आणि हिऱ्यांची चमक
लातूर, २८ मार्च २०२४( वृत्तसेवा ): भारतीय दागिन्यांच्या किरकोळ क्षेत्रातील एक प्रमुख नाव असलेल्या मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने, सावेवाडी, एम. जी. रोड, लातूर, येथील नवीन दालनाचे अनावरण केले. ४,५०० चौरस फूटावर पसरलेले, हे मलाबार गोल्ड अँड डायमंड्सचे लातूरमधील पहिले, महाराष्ट्रातील २४ वे आणि पश्चिम विभागातील ३६ वे दालन आहे. जागतिक दर्जाच्या दागिन्यांच्या खरेदीचा अनुभव देण्याच्या वचनबद्धतेसह, या आलिशान स्टोअरमध्ये डिझाईन्स आणि कलेक्शनची विस्तृत श्रेणी आहे.
(From L – R) Fanzeem Ahmmed, Regional Head (West zone, Malabar Gold & Diamonds) & Mrs. Vaishali Vilasrao Deshmukh and other important dignitaries.
मलाबार समूहाचे अध्यक्ष एम पी अहमद यांनी या स्टोअरचे दूरचित्रमाध्यमातून उद्घाटन केले. रिबन कापण्याचा समारंभ श्रीमती वैशाली विलासराव देशमुख यांच्या हस्ते पार पडला. समूहाच्या प्रवासातील या महत्त्वपूर्ण टप्पा असलेल्या या समारंभाला, श्री. फनजीम अहमद, क्षेत्रीय प्रमुख (पश्चिम विभाग, व्यवस्थापन चमूचे सदस्य आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शुभप्रसंगी उत्साह व्यक्त करताना, श्री. एम पी अहमद यांनी नमूद केले की, “आम्ही लातूरमध्ये आमचे पहिले-वहिले दालन सुरू करताना आनंदी आहोत. ही लातूरमधील लोकांसोबतच्या आश्वासक नातेसंबंधाची सुरुवात आहे आणि महाराष्ट्राप्रती आमची बांधिलकी यातून अधिकच घट्ट होणार आहे. आमचे हे आलिशान नवीन स्टोअर म्हणजे महाराष्ट्रातील लोकांच्या वैविध्यपूर्ण अभिरुचीनुसार, प्रत्येक प्रसंगासाठी चोखंदळपणे निवडून दिलेले उत्कृष्ट दागिने उपलब्ध करून देण्याची चोख हमी आहे.”
(From L – R) Fanzeem Ahmmed, Regional Head (West zone, Malabar Gold & Diamonds) & Mrs. Vaishali Vilasrao Deshmukh and other important dignitaries.
नव्याने अनावरण केलेल्या दालनामध्ये प्रशस्त अंतर्गत सजावट आणि आकर्षक वातावरण आहे, जे ग्राहकांना सोने, हिरे, पोल्की, रत्न, प्लॅटिनम आणि मौल्यवान खड्यांमध्ये बारकाईने तयार केलेल्या डिझाइनच्या दागिन्यांची विस्तृत श्रेणी जोखण्या-परखण्यासाठी आमंत्रित करते. येथील दागिन्यांचे क्युरेटेड कलेक्शन प्रत्येक ग्राहकाला परिपूर्ण वस्तू सापडेल याची खात्री करून देताना विविध अभिरुची आणि प्राधान्यक्रम पूर्ण करतात. माइन डायमंड ज्वेलरी, एरा अनकट डायमंड ज्वेलरी, डिव्हाईन हेरिटेज ज्वेलरी, एथनिक्स हँडक्राफ्टेड ज्वेलरी, प्रेसिया जेमस्टोन ज्वेलरी आणि विराज पोल्की ज्वेलरी यांसारख्या खास ब्रँड्समधील असामान्य वस्तूंना दृश्यरूपात ठेऊन, हे नवीन दालन वैशिष्ट्यपूर्ण आणि आकर्षक डिझाइनसाठी ग्राहकांच्या पसंतीचे ठिकाण बनण्याचे उद्दिष्ट ठेवते.
किमतीतील पारदर्शकता आणि निष्पक्षता याबाबत वचनबद्धतेसाठी प्रसिद्ध, मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने वाजवी किंमतीचे आश्वासन कायम ठेवले आहे, ज्यामुळे ग्राहकांना वाजवी घडणावळ शुल्कात त्यांचे इच्छित दागिने मिळू शकतात. याव्यतिरिक्त, ‘वन इंडिया वन गोल्ड रेट’ ही अभिनव योजना देशभरातील मलाबारच्या सर्व स्टोअरमध्ये सोन्यासाठी एकसमान किंमत असेल याची हमी देते.
आपल्या ग्राहकांप्रती ब्रॅण्डची बांधिलकी मजबूत करण्यासाठी, मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने १० आश्वासने दिली आहेत. या मलाबार वचनांमध्ये खड्याचे वजन, निव्वळ वजन आणि दागिन्यांतील खड्यांचे शुल्क दर्शविणारा पारदर्शक किंमतीचा समावेश आहे; दागिन्यांसाठी आजीवन मोफत देखभालीची हमी; जुन्या सोन्याच्या दागिन्यांची पुनर्विक्री करताना सोन्याचे १०० टक्के मूल्य; शंभर टक्के एचयूआयडी-अनुरूप सोने; आयजीआय आणि जीआयए-प्रमाणित हिऱ्यांची जागतिक मानकांची २८ सूत्री गुणवत्ता तपासणी, बायबॅक हमी; मोफत दागिने विमा, जबाबदार सोर्सिंग; आणि न्याय्य श्रम पद्धती या सर्वांबाबत ग्राहकांना हमी दिली जाते.