लातूर / प्रतिनिधी :
मराठवाडा जनता विकास परिषदेच्या लातूर महानगर शाखेच्या वतीने मराठवाड्याचे विकासप्रश्न ऐरणीवर घेऊन लातूर येथे लातूर, बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांचे विभागीय अधिवेशन आयोजिण्यात आले आहे.
पुढील महिन्यात होणार्या या अधिवेशनाचे उद्घाटन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते होणार असून, ना. बनसोडे यांनी यांनी परिषदेचे हे निमंत्रण स्वीकारले आहे.
ना. बनसोडे काल लातूर दौर्यावर आलेले असताना मजविप लातूर महानगर शाखेने त्यांचे, मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल, अभिनंदन केले. शिष्टमंडळात मजविपचे ( औरंगाबाद ) उपाध्यक्ष डाॅ. सोमनाथ रोडे, महानगर शाखेचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे, सचिव प्रा. विनोद चव्हाण, प्रा. सुधीर अनवले, ईश्वरचंद्र बाहेती, प्रतिक दगडे आदींचा समावेश होता.