समाजातील शेवटच्या घटकाचा विकास करून त्याचे प्रदर्शन करण्याची हिंमत फक्त पंतप्रधान मोदींमध्येच–दिलीपराव देशमुख
लातूर/प्रतिनिधी: स्वातंत्यानंतर ७० वर्ष फक्त घोटाळे झाले.मागील ९ वर्षात मात्र देशातील शेवटच्या घटकाचा विकास करण्याचे काम झाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात हा विकास झाला असून त्या कामांचे प्रदर्शन करण्याची हिंमत फक्त नरेंद्र मोदी यांच्यातच आहे,असे प्रतिपादन भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यांनी केले.
येथील दिवाणजी मंगल कार्यालयात दिल्ली येथील फ्रेंड्स एक्झिबिशनच्या वतीने भरविण्यात आलेल्या तीन दिवसीय प्रर्दशनाच्या सांगता समारंभात अध्यक्षस्थानावरून देशमुख बोलत होते.यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शैलेश गोजमगुंडे,शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे,महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष रागिणी यादव,संवेदना संस्थेचे सुरेश दादा पाटील,माजी नगरसेवक रवी सुडे, बीआयएसचे वरिष्ठ अधिकारी हर्ष शुक्ला हे प्रमुख अतिथि म्हणून उपस्थित होते.
बुधवार दि. १ नोव्हेम्बर रोजी हे प्रदर्शन सुरु झाले होते. तीन दिवस चाललेल्या या प्रदर्शनात भारतीय मानक ब्यूरो,भारतीय पोस्ट, इंडियन जियोलॉजिकल सर्व्हे,क्वायर बोर्ड,अमूल दूध,मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स,मिनिस्ट्री ऑफ ट्राईबल अफेन्स,मिनिस्ट्री ऑफ जल शक्ति,नेशनल अटलस ॲंड थिमेटिक मॅपिंग ऑर्गनाइज़ेशन, राज्य वखार महामंडळ, भारतीय स्टेट बॅंक,नेशनल बुक डेपो,सर्व्हे ऑफ इंडिया,नॅशनल केमिकल फर्टिलायज़र यासह ६० ते ७० स्टॉल उभरण्यात आले होते.
यावेळी बोलताना शैलेश गोजमगुंडे म्हणाले की,
आमदार संभाजी पाटिल निलंगेकर यांच्या मार्गदर्शनातुन आणि खासदार सुधाकर श्रृंगारे यांच्या कल्पक नेतृत्वाखाली भरलेल्या “प्रगतिशील महाराष्ट्र” या प्रदर्शनातून केंद्र सरकारच्या योजना लातुरकरांच्या घरा-घरात पोहोचविण्याचे काम करण्यात आले आहे.
तीन दिवसात १५ हजार विद्यार्थी-नागरिकांची भेट….!
तीन दिवसात या प्रदर्शनाला १५ हजार विद्यार्थी आणि नागरिकांनी भेट दिली. लातूर शहरातील विविध शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रदर्शन पाहुन आनंद व्यक्त केला.
यावेळी दिलीपराव देशमुख यांनी खासदार सुधाकर श्रुंगारे यांच्या कार्याचे कौतुक करुन लातुरच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यात शासकीय योजनांचे प्रदर्शन पहिल्यांदाच भरविले. देशातील सरकारच्या योजना लोकांना कळाव्यात म्हणून त्यांनी घेतलेला पुढाकार जिल्हावासियांसाठी मोलाचा असल्याचे गौरवोद्गार काढले.
मान्यवारांच्या भेटी …..!
तीन दिवस चाललेल्या या प्रदर्शनला जिल्ह्यातील अनेक मान्यवरानी भेटी दिल्या.जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर-घुगे यांनी प्रदर्शन पाहुन ते अत्यंत लोकोपयोगी असल्याच्या भावना मांडल्या.लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी जनजागृतीसाठी अशी प्रदर्शने आवश्यक असल्याचे सांगितले. चाकुरच्या बीएसएफ ट्रेनिंग सेंटरचे महानिरीक्षक सुरेश यादव यांनी भेट देऊन पाहणी केली. प्रारंभी मनमोहन भास्कर व आनंद पाल यांनी स्वागत केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अखिला श्रीनिवासन यांनी तर दीपकसिंग मेहता यानी आभार मानले.
सहभागी स्टॉलधारकांचा केला सन्मान !!
या प्रदर्शनात सहभागी झालेल्या स्टॉलधारकांचा पारितोषिके देऊन सन्मान करण्यात आला.बेस्ट अवेरनेश स्टॉल:भारतीय मानक ब्यूरो.बेस्ट स्टॉल बैंकिंग ॲंड फायनांस:स्टेट बैंक ऑफ इंडिया.बेस्ट स्टॉल इन ऑइल: ओएनजीसी, आईओसीएल.बेस्ट स्टॉल इन केमिकल ॲंड फर्टिलाइज़र:आरसीएफ. बेस्ट स्टॉल इन इंन्शुरन्स: न्यु इंडिया असुरेन्स. बेस्ट इंटरैक्टिव स्टॉल: जियोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया.बेस्ट स्टॉल इन मेडिकल रिसर्च: आयसीएमआर.बेस्ट स्टॉल इन सायन्स ॲंड मैपिंग सर्विस:एनएटीएमओ, सर्व्हे ऑफ इंडिया.बेस्ट स्टॉल इन अर्थ सायंइसेस: मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायंसेस.बेस्ट स्टॉल इन वॉटर रिसोर्सेस : सीडब्ल्यूसी,आयटीआय लिमिटेड.बेस्ट स्टॉल इन डिस्प्ले : क़्वायर बोर्ड.बेस्ट स्टॉल टूरीज़म : मिनिस्ट्री ऑफ टूरिझम.
विद्यार्थ्यांच्या स्टॉलमध्ये जेएसपीएम प्रथम
या प्रदर्शनात विद्यार्थी आणि पेटंट मिळविलेल्या शिक्षकांनी आपले शोध आणि प्रयोगाचे स्टॉल मांडले होते.यात जेएसपीएमच्या महाराष्ट्र कॉलेज ऑफ नर्सिंच्या सीपीआर मॉडेलने प्रथम क्रमांक पटकाविला. दुसरा क्रमांक लातूर कॉलेज ऑफ फार्मसीचा क्रिस्पर कॅश नाईन या प्रयोगला तर तिसरा क्रमांक स्वामी विवेकानंद इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटेक्निक ऑफ लातूर ने पटकाविला. यशस्वी विद्यार्थ्यांना पाहुण्याच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.