29 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeकृषी*भाजपा महायुतीचे शेतकरी पँनल*

*भाजपा महायुतीचे शेतकरी पँनल*

लातूर कृऊबा निवडणूकीतील भाजपा महायुतीच्या शेतकरी विकास पॅनलचे आ. रमेशआप्पा कराड यांनी सर्व उमेदवार जाहीर केले

लातूर ; दि.१८( प्रतिनिधी )-
लातूर कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या निवडणूकीतील भारतीय जनता पार्टी महायुतीच्‍या शेतकरी विकास पॅनलचे सर्वच्‍या सर्व आठरा उमेदवाराची घोषणा भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आमदार रमेशअप्‍पा कराड यांनी मंगळवारी केली असून शेतकऱ्यांच्‍या हितासाठी आणि बाजार समितीच्‍या सर्वांगिन विकासासाठी शेतकरी विकास पॅनलच्‍या विजयासाठी सर्वांनी जिद्दीने कामाला लागावे असे आवाहन केले.


लातूर कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या १८ संचालक पदासाठी येत्‍या २८ एप्रिल रोजी मतदान होत असून या निवडणूकीकरीता भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांच्‍या नेतृत्‍वाखाली शेतकरी विकास पॅनलच्‍या माध्‍यमातून सर्वच गटातून ५० इच्‍छुक उमेदवारांनी ५८ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. लातूर येथील भाजपाच्‍या संवाद कार्यालयात मंगळवारी दुपारी इच्‍छुक उमदेवारासह भाजपाच्‍या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत आ. रमेशअप्‍पा कराड यांनी भाजपा पुरस्‍कृत शेतकरी विकास पॅनलच्‍या सर्व आठराही उमेदवाराची घोषणा केली. यावेळी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्‍यक्ष प्रदिप पाटील खंडापूरकर, भाजपाचे जिल्‍हा सरचिटणीस विक्रमकाका शिंदे, भाजपा नेते राजेश कराड, प्रदेशाचे अमोल पाटील, तालुकाध्‍यक्ष बन्‍सी भिसे यांच्‍यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती.


आ. रमेशअप्‍पा कराड यांनी लातूर कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या निवडणूकीतील शेतकरी विकास पॅनलचे जाहिर केलेले उमेदवार पुढील प्रमाणे:- सहकारी संस्‍था सर्वसाधारण – शिंदे विक्रम श्रीधरराव कासारखेडा, बेद्रे उमेश अमृतराव भातखेडा, शिंदे संतोष मोहनराव बिंदगीहाळ, भिसे बाबासाहेब साहेबराव गाधवड, शिंदे सुरज जगन्‍नाथ निवळी, शिंदे शरद माणिकराव कारसा, पिसाळ भैरवनाथ आनंदराव पिंपळगाव अंबा, सहकारी संस्‍था महिला- कदम धनश्री बालासाहेब बोडका, मुळे राजश्री साहेबराव अंकोली, सहकारी संस्‍था इतर मागासवर्गीय- चामले बापुराव लिंगराम धनेगाव, सहकारी संस्‍था विमुक्‍त जाती भटक्‍या जमाती- सोट भागवतराव श्रीरंगराव तांदूळवाडी, ग्रामपंचायत सर्वसाधारण- गवळी सुधाकर प्रभाकर अंकोली, खंदाडे बाबु हणमंतराव गंगापूर, ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती- सवई संजू बबन शिराळा, ग्रामपंचायत आर्थिक दृष्‍टया दुर्बल घटक- कावळे विश्‍वास वसंतराव चिंचोली ब., व्‍यापारी व आडते- पाटील दिनकर लक्ष्‍मणराव, कोरे नितीन सिद्रामअप्‍पा, हमाल व तोलारी- वाघमारे नागेश रंगराव याप्रमाणे उमेदवारी जाहिर केली आहे.


यावेळी आयोजित बैठकीत बोलताना आ. रमेशअप्‍पा कराड म्‍हणाले की, निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले सर्वचजण एका पेक्षा एक वरचढ क्षमता असणारे आहेत. अर्ज दाखल केलेल्‍यांची संख्‍या अधिक असल्‍याने निवडणूकीसाठी मात्र केवळ आठरा जणांना उमेदवारी देणे हे खुप अवघड होते. तरीही ज्‍यांना उमेदवारी मिळाली नाही अशा कार्यकर्त्‍यांना येत्‍या काळात होवू घातलेल्‍या स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थेच्‍या निवडणूकीत अथवा शासनाच्‍या विविध समितीवर काम करण्‍याची जबाबदारी देवून संधी दिली जाईल. त्‍यामुळे कोणीही नाराज न होता बाजार समितीतील देशमुखांची एकाधिकारशाही संपूष्‍टात आणण्‍यासाठी, बाजार समितीच्‍या सर्वांगिन विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्‍या हितासाठी सर्वांनी जिद्दीने जोमाने कामाला लागून शेतकरी विकास पॅनलच्‍या विजयासाठी मेहनत घ्‍यावी असे आवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]