Home महत्त्वाच्या घडामोडी *फटाकड्यांचा खर्च कमी करून सहाशे झाडांची केली लागवड*

*फटाकड्यांचा खर्च कमी करून सहाशे झाडांची केली लागवड*

0
112

ग्रीन लातूर वृक्ष टीम व युवा माहेश्र्वरी लातूरचा उपक्रम.

लातूर -फटाखे वाजवू नका म्हटलं की लोकांना राग यायला लागतो, प्रदूषण, पर्यावरण, निसर्ग याबद्दल काही घेणे देणे नसणाऱ्या लोकांकडून विवीध धर्माचें सणांची नावे काढूण ट्रोल केले जाते. कितीही समजावून सांगितले तर कळत नाही. म्हणुन यातील मधला मार्ग काढून निसर्गाची काळजी घेउन दिवाळी साजरी करण्याची एक नविन कल्पना समोर आली. 

जेव्हा हा प्रस्ताव मांडला, सर्वाँना सूचना आवडली, तात्काळ तयारी सुरु झाली, प्रत्येकी २००रू जमा करुन दहा हजार रुपयेची झाडे व झाडांसाठी पाणी टँकरची सोय करण्यात आली. नियोजनानुसार आज पी. व्ही.आर. चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत जिल्हाधिकारी यांचे निवासस्थान समोरील दुभाजक स्वच्छ करुन दुभाजकात ६०० खड्डे खोदून, ६०० फुलझाडे लावली. सर्व झाडांना भरपूर पाणी दिलं.

एकमत ऑफिस समोरील  बदामांच्या   झाडांना भरपूर पाणी दिलं. ग्रीन लातूर वृक्ष टीम व युवा माहेश्र्वरी च्या सदस्यांनी श्रमदान करुन वृक्ष लागवड उपक्रम यशस्वीपने पुर्ण केला.

यावेळी लातूर जिल्ह्यातील प्रसिध्द श्वसन विकार तज्ञ डॉ. रमेश भराटे यांनी लातूरकरांनी पर्यावरणपूरक व प्रदुषणविरहित दिवाळी साजरी करावी असे आवाहन केले.

ग्रीन लातूर वृक्ष टीम

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page