आरोग्य शिबिरात विविध आजाराच्या 504 रुग्णांवर मोफत उपचार
लातूर, दि. 3 –
माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समुहाचे संस्थापक तथा मुख्य संरक्षक विश्वस्त प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांचा 81 वा वाढदिवस गुरुवार, दि. 3 फेब्रुवारी रोजी विविध सामाजिक उपक्रम घेवून साजरा करण्यात आला. त्वचारोग तपासणी शिबिर, महिलांसाठी गर्भाशय कर्करोग तपासणी शिबिर, बालकांसाठी लसिकरण, कोविड पश्चात भौतिकोपचार शिबिर, दंत रोग तपासणी उपचार शिबिर, कवळी वाटप, दात काढणे, साफ करणे शिबिर, दंत रोग उपचार अशा विविध आरोग्य शिबिरात एकुण 504 रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले. तर रक्तदान शिबिर 54 दात्यांनी रक्तदान केले.
प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या वाढदिवसानिमित्त एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयातील श्रीमती सरस्वती कराड रक्तपेढी येथे आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रशासकीय व शैक्षणीक संचालीका डॉ. सरिता मंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उप अधिष्ठाता डॉ. बी. एस. नागोबा, प्रशासकीय अधिकारी सचिन मुंडे, मधुकर गुट्टे, रक्त संक्रमन अधिकारी डॉ. मिना सोनवणे, श्रीपती मुंडे, प्राचार्य डॉ. पल्लवी जाधव, प्राचार्य सरवनन सेना उपस्थित होते. या शिबिरात एकूण 54 दात्यांनी रक्तदान केले.
स्त्रीरोग विभागाच्या वतीने गर्भाशय मुखाचा कर्करोग निदान शिबिर घेण्यात आले. या मध्ये 32 महिलांची पॅप स्मीअर ही तपासणी करण्यात आली. या तपासणीतून सुरुवात झालेल्या व भविष्यात होणाऱ्या गर्भाशय कर्करोगाचे निदान करण्यात आले. गर्भाशय, अंडाशय कर्करोगाबद्द्लची माहिती व घ्यावयाची काळजी या विषयी उपस्थित महिला रुग्णांना माहिती देण्यात आली. या वेळी स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉ. सी. एस. पाटील, डॉ. क्रांती केंद्रे, डॉ. आरती ढोबळे, डॉ. रोशनी आकुसकर, डॉ. चेतन सावरीकर, डॉ. मुशीर शेख यांनी सेवा बजावली.
त्वचारोग विभागाच्या वतीने त्वचारोग उपचार शिबिरात गचकर्ण, सोरायसिस, मुरुम, चाई, कोंडा, वांग, काळे डाग, सुरकुत्या, पांढरे केस, केस समस्या, लैगिक समस्या, नख व नखांचे विकार आदी आजारांच्या 62 रुग्णांची त्वचारोग तज्ज्ञ डॉ. हेमंत केंद्रे, डॉ. रामकुमार, धनुका, डॉ. अजय मोरे यांनी तपासणी करुन उपचार केले.
बालरोग विभागाच्या वतीने 38 बालकांचे लसिकरण करण्यात आले. मुल जन्मानंतर पालकांनी वयाच्या पाच वर्षापर्यंत आपल्या मुलाचे वेळापत्रकात ठरवून दिल्याप्रमाणे लसिकरण करुन घ्यावे. संसर्गजन्य आजारापासून संरक्षण मिळण्यासाठी लसिकरण महत्त्वाचे ठरते असे यावेळी उपस्थित पालकांना बालरोग तज्ज्ञ डॉ. विद्या कांदे यांनी सांगून लसिकणाविषयी जागृती केले. या वेळी बालरोग तज्ज्ञ डॉ. शिल्पा दडगे, डॉ. दत्तात्रय कुलकर्णी, डॉ. प्रविण डोरले यांनी सेवा बजावली.
एमआयपी फिजीओथेरपी महाविद्यालयात कोविड पश्चात भौतिकोपचार शिबिर घेण्यात आले. या मध्ये कोरोनातून बरे झालेल्या 70 रुग्णांची तपासणी करुन भौतिकोपचार करण्यात आले. या वेळी रुग्णांना शारीरिक क्षमता वाढविण्याचे व्यायाम, श्वसनाचे व्यायाम, पोस्ट कोविड मधील समस्या या विषयी तज्ज्ञांनी माहिती देऊन सोबत रुग्णांना व्यायमाचे माहितीपत्रक देण्यात आले. या वेळी डॉ. पल्लवी जाधव, डॉ. विश्वनाथ पावडशेट्टी, डॉ. गौरव भटनागर, डॉ. नेहा सिंह, डॉ. जावेद सिद्दिकी, डॉ. शितल घुले, डॉ. नेहा मेश्राम, डॉ. श्रुती ताडमारे, डॉ. रिषा कांबळे यांनी सेवा बजावली.
तसेच एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील कृत्रिम दंत रोपण विभागात 25 रुग्णांवर मोफत कवळी बसविण्याचे उपचार करण्यात आले. मुख व शल्य चिकित्सा शास्त्र विभागात 26 रुग्णांची मोफत तपासणी करुन त्यांचे दात काढण्यात आले. तर दंत परी वेष्टन शास्त्र विभागात 24 रुग्णांचे मोफत दात साफ करण्यात आले. या कार्यक्रामाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. सुरेश कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उप प्राचार्य सुरेश कांगणे व सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. त्यासोबतच सार्वजनिक आरोग्य दंत चिकित्सा विभागाच्या वतीने रेणापूर तालुक्यातील खरोळा येथे घेण्यात आलेल्या दंतरोग उपचार शिबिरात 52 रुग्णांची तर लातूर येथील हजरत सुरत शहा उर्दू विद्यालयात 175 विद्यार्थ्यांची मोफत दंत रोग तपासणी करुन उपचार करण्यात आले.
प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांसाठी एमआयटी शिक्षण संकुलातील विविध महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्त्र कर्मचारी, विद्यार्थी, पालक व रुग्ण उपस्थित होते.
———————————————————-