पुणे, २१ सप्टेंबर २०२२: पुण्यातील मालमत्तांच्या किंमती २०२२ च्या एप्रिल जून तिमाहीत वार्षिक पातळीवर ९ टक्क्यांनी वाढल्या असून भाड्याचे दर आणि सध्याच्या भौगोलिक राजकीय तणावामुळे वाढलेले इनपुट खर्च यांच्यामुळे ही वाढ झाली आहे, असे मत ऑनलाइन रिअल इस्टेट कंपनी प्रॉपटायगर डॉटकॉम आणि आरईए इंडिया यांनी केलेल्या अहवालात नमूद केले आहे.
रियल इनसाइट रेसिडेन्शियल- एप्रिल- जून २०२२ या अहवालानुसार भारतातील या शहरातील नवीन आणि विद्यमान इन्व्हेंटरीसाठी सरासरी मालमत्तेची किंमत ३० जून २०२२ रोजीनुसार ५४००- ५६०० प्रति चौ. फूट राहिली आहे.
ही वाढ झाल्यानंतरही पुण्यातील मालमत्तांच्या किंमती भारतातील इतर मोठ्या शहरांच्या म्हणजे मुंबई, हैदराबाद, बंगळुरू आणि चेन्नई यांच्या तुलनेत कमी आहेत. या शहरांखेरीज आरईए इंडियाच्या पाठबळाने प्रॉपटायगर.कॉमने केलेल्या विश्लेषणात अहमदाबाद, कोलकाता आणि दिल्ली- राष्ट्रीय राजधानी प्रदेशाचाही समावेश आहे.
जून २२ नुसार रूपये प्रति चौ. फुटात किंमत | ||
शहर | मार्च २२ नुसार रूपये प्रति चौ. फुटात किंमत | वार्षिक टक्के वाढ |
अहमदाबाद | ३,५००-३,७०० | ८ टक्के |
बंगळुरू | ५,७००-५,९०० | ७ टक्के |
चेन्नई | ५,७००-५,९०० | ९ टक्के |
दिल्ली एनसीआर | ४,६००-४,८०० | ६ टक्के |
हैदराबाद | ६,१००-६,३०० | ७ टक्के |
कोलकाता | ४,४००-४,६०० | ५ टक्के |
मुंबई | ९,९००-१०,१०० | ६ टक्के |
पुणे | ५,४००-५,६०० | ९ टक्के |
भारत | ६,६०० – ६,८०० | ७ टक्के |
*नवीन पुर०ठा आणि इन्व्हेंटरीनुसार भारित सरासरी किंमती
स्त्रोत: रियल इनसाइट रेसिडेन्शियल– एप्रिल – जून २०२२, प्रॉपटायगर रिसर्च
“मालमत्तेच्या किंमतीतील मोठी वाढ आणि वाढता रेपो रेट यांच्यामुळे पुण्यातील घर खरेदीदारांवर एक मोठा प्रभाव पडला आहे. हे नंतर हळूहळू कमी झालेल्या निवासी मालमत्ता वाढीमध्येही दिसून आले आहे. तथापि, रेपो रेट जागतिक साथीपूर्वीच्या ६-७ टक्के दरावर राहिले आहेत. याचबरोबर सणांचा कालावधी आणि ऑफिसच्या खरेदीत वाढलेला प्रभाव यांच्यामुळे नजीकच्या भविष्यात कुंपणावर असलेल्या ग्राहकांच्या भावनांना प्रोत्साहन मिळेल”, असे मत हाऊसिंग डॉटकॉम, प्रोपटायगर डॉटकॉम आणि मकान डॉटकॉमचे समूह मुख्य वित्तीय अधिकारी श्री. विकास वाधवान यांनी व्यक्त केले.
जूनच्या तिमाहीत पुण्यातील विक्री आणि नवीन पुरवठ्याच्या वाढीचा वेग घटला:
पुण्यातील विक्री आणि नवीन पुरवठा या दोन्ही गोष्टींमध्ये एप्रिल जून २०२२ च्या तिमाहीत अनुक्रमे १६ टक्के आणि १४ टक्क्यांची घट झाली आहे. ही घट झालेली असतानाही निवासी नवीन घरे आणि पुण्यातील मागणी २०१९ च्या जागतिक साथपूर्व पातळीच्या ९० टक्के जवळ आहेत. तीन महिन्यांच्या कालावधीत पुण्यात एकूण १३३९० घरे बाजारात आली तर या कालावधीत १३७२० घरे विकली गेली.
रावेत, हिंजवडी, मोशी, ताथवडे आणि वाकड यांच्यासारख्या सूक्ष्म बाजारपेठांमध्ये क्यू २ २०२२ मध्ये जास्तीत जास्त मागणी दिसून आली. हिंजवडी आणि मोशी या परिसरातील जास्तीत-जास्त विक्री २५-४५ लाख रूपयांच्या टप्प्यात होती आणि रावेत, ताथवडे आणि वाकडमध्ये ती ४५-७५ लाखांच्या घरात होती.
पुण्यातील घर खरेदीदारांनी २ बीएचकेची घरे खरेदी करण्यास प्राधान्य दिले. शहरातील एकूण विक्रीच्या ५३ टक्के ही घरे होती.
“पुणे शहरात सर्वोच्च ८ महानगरांपैकी निवासी मागणी दुसऱ्या क्रमांकाची असली तरी एप्रिल- जून २०२२ या कालावधीत मालमत्तेच्या विक्रीत १६ टक्क्यांची घट झाल्याचे दिसून आले आहे. नियंत्रित नवीन अनावरणे आणि इनपुट खर्चाच्या ताणामुळे मालमत्तेच्या किंमतीतील वाढ यांच्यामुळे पुण्यातील मालमत्ता बाजारपेठ थोडी मागे हटली आहे. पाया मजबूत आहे आणि कार्यालये उघडली जात असल्याने आगामी तिमाहींमध्ये मागणी पुन्हा सकारात्मक होईल”, असे मत हाऊसिंग डॉटकॉम, प्रोपटायगर डॉटकॉम आणि मकान डॉटकॉमच्या संचालक आणि संशोधन प्रमुख श्रीमती अंकिता सूद यांनी व्यक्त केले.
पुण्यातील इन्व्हेंटरी ओव्हरहँग २५ महिन्यांपर्यंत कमीः कोलकात्यानंतर सर्वोच्च ८ शहरांमध्ये सर्वांत कमी:
पुण्यातील विकासकांकडे ३० जून २०२२ नुसार मुंबईनंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा विकला न गेलेला सर्वाधिक १,१७,९९० घरांचा साठा आहे. तथापि, शहरातील विक्रीचे आकारमान नियंत्रित राहिले असले तरी क्यू२ २०२१ च्या तुलनेत ते खूप जास्त आहे. त्याचे कारण जागतिक साथीची दुसरी लाट होते. त्यामुळे जून २०२२ नुसार बिल्डर्सना हा विकला न गेलेला साठा विकण्यासाठी क्यू२ २०२१ च्या ४४ महिन्यांच्या तुलनेत २५ महिने लागतील, असा अंदाज आहे.