मुंबई : ; दि.१३- (प्रतिनिधी ) –राज्यात सर्वदूर जोरदार पाऊस सुरू असतानाच हवामान खात्याकडून पुढचे दोन दिवस मुसळधार पाऊस राहिल असा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत १४ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट असून यासोबतच पालघर, नाशिक, पुणे यासह ४ जिल्ह्यांमध्ये १५ जुलै या कालावधीत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
येत्या १५ जुलैपर्यंत राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा, पालघरसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता गृहीत धरून ‘आयएमडी’तर्फे या दोन विभागांना पुढील दोन दिवसांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
राज्याच्या अन्य विभागाबरोबरच १३ ते १५ जुलैपर्यंत मराठवाड्यालाही १३ते१५ जुलै पर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे अनेक गावांमध्ये नद्यांना पूर येण्याचा धोका असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.