प. पू. विद्यानंदजी महाराज यांनी भागवत कथेच्या समाप्ती दिवशी दिला आहे हितोपदेश
लातूर ; दि. ३१ ( प्रतिनिधी )- नववर्षाचे स्वागत असो की, वाढदिवस… किंवा उत्सव आपण आपल्या भारतीय संस्कृती प्रमाणे , पारंपरिक पद्धतीने साजरे न करता पश्चिमात्य संस्कृतीचे अं:धानुकरण करून करीत आहोत , त्यामुळे भारतीय संस्कृती धोक्यात आली आहे. तरुणपिढीने पश्चिमात्य संस्कृतीचे अं:धानुकरण करू नये . आपले नववर्ष हे गुढीपाडव्यापासून सुरू होते. नववर्षाच्या पूर्वसंध्येला 31 डिसेंबर रोजी आपण वेगळे सेलिब्रेशन करतो. हे आपल्या संस्कृतीत बसत नाही. त्यामुळे या अनिष्ट प्रथेचा त्याग करावा , असे आवाहन प.पू. विद्यानंदजी महाराज सागर महाराज( बाबा )यांनी भागवत कथेच्या आशीर्वचनात बोलतांनाना केले .
श्री राधाकृष्ण सत्संग समितीच्या वतीने लातूर येथील पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात विद्यानंदजी महाराज यांच्या श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले असून शनिवारी या कथेची पूर्णाहुती झाली. याप्रसंगी पूजनीय बाबा बोलत होते।
31 डिसेंबरला आपण रात्री उशिरापर्यंत जागून नववर्षाचे स्वागत करण्यासाठी ‘ सेलिब्रेशन ‘ करतो , मद्यपान करतो. नाच गाने करतो. हे आमच्यासारख्या संत , महंत, ऋषीमुनींना व महाराजांना क्लेषदायक आहे. माझ्यासाठी सारख्या संस्कृती मानणार्या महाराजांना नववर्ष हे गुढीपाडव्याला येत असते असे वाटते. तुम्हाला नववर्षत साजरे करायचे असेल तर ते गुढी पाडव्या दिवशी साजरे करा. पाश्चिमात्य संस्कृतीचे अं:धाणूकरण करू नका .हा देश बलशाही शूरवीरांचा देश आहे . त्यामुळे तरुणांनी व्यसनाधींनतेच्या पाठीमागे न लागतात सदाचाराकडे वळावे. बलवान, बलशाली व सदाचारी तरुण- तरुणाणींची या देशाला खरी गरज आहे. त्यामुळे व्यायाम करा , योग करा ,आहार व आचार विचार बदला .आपण कसे आणि काय खातो , आपण काय पितो , आपण कसे वागतो याकडे सगळे जण पाहत असतात. येणाऱ्या पिढीला आपण काय देणार आहोत ? त्यासाठी असल्या अनिष्ट प्रथेचा त्याग करून नवभारत घडविण्यासाठी तरुणपिढीने एकत्र आले पाहिजे.
पूजनीय बाबांनी भागवत कथेमध्ये आज कंस वध ,रुक्मिणी स्वयंवर ,श्रीकृष्ण – सुदामा भेट आदींची कथा सांगून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. बाबा आपल्या कथेमध्ये केवळ भागवत कथेतील वेद व त्याचा अर्थ सांगण्यावर भर देत नसून आपल्या देशातील अनिष्ट प्रथा , अनिष्ट रूढी परंपरा यावर भाष्य करतात आणि समाजाने ,तरुणपिढीने , माता भगिनींनी कशा पद्धतीने वागले पाहिजे याचाही ते हितोपदेश देतात .आपला धर्म काय? आपली संस्कृती काय ? आपण काय वागायला लागलो ? आपण कुठे चाललो आहोत … ? यावर देखील ते उपस्थितांच्या डोळ्यांमध्ये अंजन घालत असतात.
यावेळी बोलताना बाबा म्हणाले की ,उपवर मुलींचे विवाह होत नसल्यास काहीजण त्यांना रुक्मिणी स्वयंवराचे वाचन करा असा सल्ला देतात.असे केल्यामुळे विवाह जमतात का ? यावर माझा विश्वास नाही .तसेच आपल्यावर आलेले संकट दूर करण्यासाठी किंवा ग्रहाची शांती करण्यासाठी आपण नारायण नागबळी करा यासारखे सल्लेही काहीजण देत असतात.नाशिक आदी ठिकाणी नारायण नागबळी विधी मोठ्या प्रमाणात केला जातो. नारायण नागबळी परंपरा आहे . यामुळे नारायण नागबळी केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये बदल होतो , परिवर्तन होतो असे म्हणायला मी तयार नाही. हा समज खोटा आहे. 51 हजार , 31 हजार आदि मोठी दक्षिणा घेऊन नारायण नागबळीचा विधी करणारे अनेकजण आपल्याला सापडतात . सोन्याचा नाग आणा असा आग्रह धरला जातो.नारायण नागबळीचा विधी करणारे शास्त्राने किती पारंगत आहेत किंवा आपण कोणाकडून हा विधी करून घेतो याचे हा विधी करून घेणाऱ्याना काही ज्ञान नसते .त्यामुळे नारायण नागबळी करून घेतल्यानेत्र आपल्या ग्रहावरील संकट दूर होऊन आपले जीवन सुखमय होईल हा समज डोक्यातून काढून टाकावा असे आवाहनही त्यांनी केले.
काम ,क्रोध, मद, मत्सर या गोष्टी मध्येच आपण आडकून गेलो आहोत. काम कधी करावा किंवा इतर क्रीडा कधी करायला हवे .. त्याला आधार आहे .आनंद मिळतो म्हणून काम क्रीडा करावी हे अनेकांना वाटते. कामामुळे आनंद मिळतोच असे नाही. काम पुरुषांर्थ है तो उसे विकार क्यू कहा जाता है ? असा सवालही बाबांनी यावेळी उपस्थित केला. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये परिवर्तन आणणे गरजेचे आहे .भगवान ढुंढणा आसान है ,लेकिन संत बनना कठीण है. भगवान को ढुंढणे के बजाय आप अच्छा इंसान बनने की कोशिश करो, असे सांगत बाबांनी आपली भागवत कथा सफल झाली असे म्हणता येईल ,असे स्पष्ट केले. आपण धन किती कमवायचे याला कुठेतरी मर्यादा असली पाहिजे. धन भरपूर कमवा पण थांबायलाही शिका .संसार करा परंतु तो फलदायी असा करा . ईश्वरापर्यंत जाण्याचा मार्ग हा काट्याकुट्यांनी भरलेला मार्ग आहे. कमळाचे फुल हे चिखलातूनच उगत असते त्यामुळे चिखलातून कमळाचे फुल उगवते याचा अर्थ आपले जीवन कष्ट , दु:ख , यातना ,समस्या रहित असते. आपले जीवन जर सुखकर आणि समाधानी बनवायचे असेल तर कष्टाच्या मार्गावर मार्गक्रमण केले पाहिजे. कष्ट, दुःख , यातना या जीवनामध्ये आल्याच पाहिजेत .त्यावर मात करीत पुढे मार्गक्रमण करायला हवे .म्हातारपणी वेळ जात नाही म्हणून मंदिरात जाऊन पूजाअर्चा करण्यात किंवा टाळकुटत बसण्यामध्ये काहीही अर्थ नाही. भगवंताचे नामस्मरण करण्याची सवय आपण सुरुवातीपासूनच लावून घेतली पाहिजे. तरुणपणी फक्त आपल्याला स्वार्थ करायचा , भोग घ्यायचा आहे , एवढ्या गोष्टींमध्येच मर्यादित न राहता सुरवातीपासूनच आपण परमार्थाकडे लक्ष दिले तर आपले जीवन सुखकर होईल.
काही तथाकथित बुद्धिमान व स्वतःला सुधारणावादी म्हणणारे लोक व रामावर टीका करतात . स्वतःच्या बायकोला सांभाळता आले नाही तो काय आपला समाजाला व आम्हाला सांभाळ करणार ? असे आम्हाला उद्देशून ते टीका करीत असतात. रावण हा बलशाली होता त्याच्या तावडीतून जो आपल्या सीतेला सुरुवातीला सोडू शकला नाही. त्यासाठी त्याला युद्ध करावे लागले असा, हा राम महापराक्रमी कसा असू शकतो ? असा सवालही काही जण उपस्थित करतात . परंतु त्याला काहीही आधार नाही. राम हा सदाचारी, आदर्श पुरुष होता याकडे ते कानाडोळा करीत असतात.
सध्या होत असलेल्या आंतरधर्मीय , आंतरजातीय विवाह संदर्भात देखील पूजनीय बाबांनी या कथेमध्ये आई-वडिलांच्या डोळ्यांमध्ये अंजन घालण्याचा प्रयत्न केला . लव जिहाद यासारखे प्रकरणे का घडत आहेत याचे आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण आजच्या पिढीने केले पाहिजे. आपली मुलगी काय करते ? कुठे जाते ? याची तिच्या आईला पूर्ण माहिती असते. परंतु आजकालची आई ( सगळ्यात नव्हे ) ही फक्त मोबाईलमध्ये गुंग झाली आहे. त्यामुळे आंतर धर्मीय ,आंतरजातीय विवाह मोठ्या प्रमाणात होत आहेत. याला आपण स्वतः जबाबदार आहोत .याला इतरांना दोष देण्यामध्ये काही अर्थ नाही. हे जर थांबायचे असेल तर आपण आपल्या घरातील वातावरण बदलायला हवे. आपली मुलं – मुली काय करतात ? कुठे जातात?याकडे बारकाईने लक्ष द्यायला हवे , असेही बाबांनी यावेळी बोलताना सांगितले.
सध्या सोशल मीडियाचे व फेसबुक मोबाईलचे प्रस्थ वाढले आहे. प्रत्येकाला आपल्या हाती मोबाईल असावा असे वाटते. मोबाईल हा फक्त ज्ञान मिळवण्यासाठी आहे याकडे अनेकांचे दुर्लक्ष होते। मोबाईलच्या आहारी जाऊन अनेक जण सुखी संसाराला मुकलेली आहेत. मोबाईलचा वापर कितपत करायचा आणि कुठपर्यंत करायचा याचा साकल्ल्याने विचार प्रत्येकाने करायला हवा. मोबाईल मुळे तुमच्यावर चांगला परिणाम होण्याऐवजी वाईटच परिणाम जास्त होत आहे .मोबाईल मुळे बऱ्याच गोष्टी लुप्त होत चाललेल्या आहेत , हे तुम्हाला कधी कळणार आहे .
शनिवारी या भव्य कथा मंडपामध्ये सात दिवस चाललेल्या भागवत कथा ज्ञानयज्ञाची समाप्ती झाली. रविवारी सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये काल्याचे कीर्तन होणार असून महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे .आजच्या कथेमध्ये महंत परमपूजनीय स्वामी शैलेशानंदजी महाराज( दिल्ली) , ज्ञानेश्वर महाराज , महादेव महाराज शास्त्री आदींची उपस्थिती होती. गणपतराव बाजुळगे यांनी प्रास्ताविक केले. बालकानंद महाराज, दिव्यानंदजी महाराज आदींनी आशीर्वचन दिले . दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, माजी नगरसेवक आनंद गायकवाड , शैलेश लाहोटी, गणेश होळे, ज्ञानोबा बोयणे, सुधाकर काळे तसेच पंचमुखी हनुमान मंदिर देवस्थान समितीच्या सदस्यांनी भागवत कथा ग्रंथाचे व पूजनीय बाबांचे पूजन केले. यावेळी मोठ्या संख्येने स्त्री पुरुष भावी मंडपामध्ये उपस्थित होते.