32.1 C
Pune
Thursday, April 24, 2025
Homeमहत्त्वाच्या घडामोडीपालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा 'देवघर' वर भव्य सत्कार

पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा ‘देवघर’ वर भव्य सत्कार

लातूरला जिल्हा रुग्णालय लवकरच स्थापन करण्यासाठी प्राधान्यक्रम देणार

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लातूरकरांना केले आश्वासित

पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची ‘देवघर’ला सदिच्छा भेट

लातूर (माध्यम वृत्तसेवा) -दि.२७-लातूरला जिल्हा रुग्णालय व्हावे ही समस्त लातूरकरांची मागणी आहे. लातूरचा हा जिव्हाळ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्यक्रमाने लक्ष देणार असल्याचे , राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लातूर येथे ‘ ‘देवघर ‘वरील आयोजित कार्यक्रमात बोलताना स्पष्ट करीत समस्त लातूरकरांना आश्वासित केले.

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे नवनिवार्चित पालकमंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या आगमनानिमित्त डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या पुढाकारातून ‘देवघर’ निवासस्थानी त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिवेंद्रसिंहराजे भोसले बोलत होते.
प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे लातूरला आले असताना ‘देवघर ‘ येथे डॉ अर्चनाताई पाटील मित्रमंडळ व चाकूरकर परिवाराच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला .शाल श्रीफळ ,कोल्हापुरी फेटा व भगवान शंकराची मूर्ती देऊन डॉ.अर्चनाताई पाटील यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे हजारो स्त्री- पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.

ज्यावेळी डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी पालकमंत्री भोसले यांचा सत्कार केला आणि त्यांनी प्रास्ताविक भाषण केले यावेळी त्यांनी सर्वप्रथम लातूर जिल्हा रुग्णालयाच्या विषयाला हात घातला आणि हा विषय तातडीने सोडवला जावा , याकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले.हाच धागा पकडून शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपल्या भाषणामध्ये जिल्हा रुग्णालयाचा विषय लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे सांगत लातूरचा पाणी आणि रस्ते हा प्रलंबित विषय देखील लवकरच सोडवायला जाईल ,असेही आश्वासन समस्त लातूरकरांना यावेळी बोलताना दिले.

लातूरकरांना सक्षम व आपल्या मर्जीतील पालकमंत्री द्यावा अशी मागणी अर्चनाताईंनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली होती. वास्तविक पाहता ज्यावेळी पालकमंत्री करण्याचा निर्णय झाला त्यावेळी या संदर्भात देवेंद्रजी आपल्याशी काही बोलले नाहीत परंतु लातूरला आपल्याला का पाठवले गेले याचा अभ्यास आपल्याला आता करावा लागेल ,कारण देवेंद्रजींचे गणित सोपे नाही हे आपल्याला येथे आल्यानंतर कळाले आहे .कुणाला कुठे बसवायचे आणि कुणाकडे काय जबाबदारी द्यायची हे मुरब्बी देवेंद्रजींना चांगले माहित आहे, त्यामुळेच बहुतेक आपली लातूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागली असल्याचे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. तेव्हा उपस्थितामध्ये हास्याची खसखस पिकली.

 

भोसले घराणे व चाकूरकरांचा जिव्हाळा

यावेळी बोलताना डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी भोसले घरांना व चाकूरकर परिवार यांचा जिव्हाळ्याचा संबंध असल्याची आठवण यावेळी बोलताना करून दिली. श्रीमंत अभयसिंहराजे भोसले हे काँग्रेस पक्षामध्ये असताना त्यांचे व आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते असे यावेळी त्यांनी आवर्जून सांगितले.

आपल्या मनोगतामध्ये बोलताना डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी लातूर जिल्हा रुग्णालयाचा जिव्हाळ्याचा प्रश्न उपस्थित करून या प्रश्नाकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले .अनेक वर्षापासून लातूरला जिल्हा रुग्णालय व्हावे ही समस्त लातूरकरांची मागणी आहे. परंतु येथील नेतृत्वाने या मागणीकडे म्हणावे तसे लक्ष दिले गेले नाही त्यामुळे या प्रलंबित प्रश्नाकडे आपण लक्ष द्यावे कारण हा विषय सार्वजनिक बांधकाम विभाग या विभागाकडे येतो.या विभागा आपल्या अखत्यारीत असल्याने आणि हे खाते आपल्याकडे असल्याने हा विषय आपल्याला सोडवता येईल. तसेच लातूरचा पाणी व रस्ते हा प्रश्न देखील प्रलंबित आहे, लातूरकरांची ही मागणी पूर्ण करण्यासाठी आपण पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांकडे शब्द टाकावा ,असे सांगत अर्चनाताईंनी त्यांचे पाणी ,रस्ते व आरोग्य या तिन्ही महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधले.

‘देवघर’ येथे यावेळी सौ. संजीवनी रमेश आप्पा कराड, ऋषिकेश कराड,भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, अँड .व्यंकटराव बेद्रे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन दाणे, आरपीआय कवाडे गटाचे एन.डी. सोनकांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.


अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश
डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांच्या देवघर या निवासस्थानी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भेट दिली असता त्यांचे भव्य स्वागत झाले .तसेच पालकमंत्री महोदय व डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांच्या उपस्थितीत अनेक काँग्रेस पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला .यामध्ये मुख्यत्वे माजी बांधकाम सभापती विजय धन्ना, संजय सूर्यवंशी, सुशील अग्रवाल, उमाकांत मळगे यांच्यासमवेत प्रभाग क्र.15 मधील प्रमुख पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.
यावेळी लातूर भाजपा जिल्हाध्यक्ष देविदास काळे, दिलीप देशमुख,रागिनीताई यादव, अविनाश कोळी, अँड दिग्विजय काथवटे, संजय रंदाळे, दीपक मठपती हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]