20.6 C
Pune
Saturday, January 4, 2025
Homeसामाजिकपानगाव येथील विठ्ठल मंदिराचे जीर्णोद्धार

पानगाव येथील विठ्ठल मंदिराचे जीर्णोद्धार

पानगावच्या विठ्ठल मंदिर जीर्णोद्धार कामाचे
आ. रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते भूमिपूजन
मंदिर परिसर विकासासाठी आणखी पाच कोटी रुपये मिळून देण्याची ग्वाही

लातूर दि.१३ – (माध्यम वृत्तसेवा ):–प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या पानगाव येथील पुरातन विठ्ठल मंदिराच्या दुरुस्ती आणि वास्तु जतन कामासाठी पुरातन विभागाकडून मंजूर झालेल्या ९ कोटी ३४ लक्ष रुपये खर्चाच्या कामाचा भूमिपूजन भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते रविवारी सकाळी झाला या मंदिर परिसराच्या विकासासाठी आणखी पाच कोटी रुपयांचा निधी मिळवून देऊ अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.


रेणापूर तालुक्यातील मौजे पानगाव येथे आ. रमेशआप्पा कराड यांच्या माध्यमातून विविध विभागाअंतर्गत मंजूर झालेल्या विठ्ठल मंदिर जिर्णोद्धार कामासह १२ कोटी १६ लक्ष रुपये खर्चाच्या विविध कामाचा लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या शुभहस्ते १३ ऑक्टोबर रविवार रोजी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पडला. आ. कराड यांचे पानगाव नगरीत आगमन होताच ग्रामस्थांकडून वाजत गाजत फटाके फोडून, जेसीबीतून फुलांची उधळ करत मोठ्या जल्लोषाच्या वातावरणात जागोजागी भव्य दिव्य स्वागत करण्यात आले.

ठिक ठिकाणी महिला भजनी मंडळ आराधी मंडळ यांच्यासह लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी औक्षण करून स्वागत केले. यावेळी भाजपा पंचायत राज सेलचे जिल्हा संयोजक नवनाथ भोसले, तालुकाध्यक्ष दशरथ सरवदे, संगायो समिती अध्यक्ष वसंत करमुडे, माजी उपसभापती अनंत चव्हाण, माजी सरपंच सुकेश भंडारे, ज्येष्ठ मार्गदर्शक व्यंकटराव अनामेमामा, मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप कुलकर्णी, चंद्रकांत आरडले, भाजपा शहराध्यक्ष गणेश तूरूप, श्रीकृष्ण जाधव, अमर चव्हाण, ललिता कांबळे, शीला आचार्य, सरपंच मीनाताई मोटाडे, उपसरपंच प्रेमीला वाघमारे, चेअरमन गणेश वांगे यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती.


लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी जेव्हापासून लातूर ग्रामीणची जबाबदारी माझ्या खांद्यावर दिली तेव्हापासून प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगून यावेळी बोलताना रमेशअप्पा कराड म्हणाले की, पानगावच्या विठ्ठल मंदिरासह मतदार संघातील साडेतीनशे मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचे भाग्य आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मला मिळाले. पानगावच्या विठ्ठल मंदिराला साडेनऊ कोटी रुपये निधी मिळेल असे पानगावकरांनाही वाटले नव्हते मात्र आज या कामाचे भूमिपूजन झाले. निश्चितपणे अत्यंत दर्जेदार काम होऊन हे मंदिर लवकरच नव्या रूपात भाविक भक्तांना पाहायला मिळेल. या मंदिराच्या परिसर विकासासाठी येत्या काळात आणखी पाच कोटी रुपयांचा निधी मिळून देऊ त्याचबरोबर मुस्लिम बांधवांसाठी शादीखाना बांधकामा करिता ५० लाख आणि अस्थी परिसर विकासासाठी निधी देणार असल्याचे सांगून पानगावच्या ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे कदाचित आचारसंहितेपूर्वी मंजुरी मिळेल असे त्यांनी बोलून दाखविले.


जे होतंय, जे शक्य आहे तेच बोलतो आणि शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करतो. मित्रासारखे खोटी आश्वासने देऊन झुलवत ठेवत नाही. मतदार संघातील गावागावातील महायुती शासनाच्या विविध खात्यामार्फत कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर करून दिला मात्र लातूर ग्रामीणच्या आमदाराला श्रेय लाटण्याची मोठी हौस असून आपण मंजूर केलेल्या अनेक कामाचे श्रेय घेण्याचा केविलवाणी प्रयत्न केला असल्याचे सांगून आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, गेल्या १५ वर्षात काँग्रेसच्या आमदारांनी काय दिले कुठल्या कामाला निधी दिला आणि ४ वर्षात मी गावागावात किती निधी दिला कोणती कामे केली याचा हिशोब जनतेनी करावा.
केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन लाडकी बहीण योजनेविरुद्ध न्यायालयात जाणाऱ्या काँग्रेसचा समाचार घेताना महिलांच्या बँक खात्यात योजनेचे पैसे जमा होताच ही योजना खोटी आहे, पैसे मिळणार नाहीत, फसवी आहे असे सांगणाऱ्या काँग्रेसच्या तोंडात मारल्यासारखे झाले. मागील काळात महायुती शासनाने सुरू केलेल्या अनेक लोक हिताच्या योजना बंद केल्या होत्या याची जाणीव ठेवून येणाऱ्या काळात होणाऱ्या निवडणुकीत जनहिताच्या योजना या पुढील काळात कायमपणे सुरू ठेवण्यासाठी आपली काळजी घेणाऱ्या महायुती सरकारच्या पाठीशी राहावे आशीर्वाद द्यावेत असेही आव्हान आ. कराड यांनी यावेळी केले.


विठ्ठल मंदिर जन्मदर कामाच्या संपूर्ण प्रक्रियेची माहिती देऊन आपल्या प्रास्ताविकातून बोलताना ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप कुलकर्णी म्हणाले की आ. रमेशआप्पा कराड यांच्यामुळेच मंदिराच्या या कामाला मान्यता मिळाली, मंत्रालयातील प्रक्रिया वेगाने झाली. सनातन धर्माच्या विचाराला समर्थन देणारे सरकार राज्यात आले पाहिजे आणि तशाच विचाराच्या उमेदवाराला भाविक भक्तांनी साथ द्यावी असे बोलून दाखविले तर चंद्रकांत आरडले यांनी राजकारणातील वारकरी आमदार रमेश आप्पा कराड यांनी दिलेला शब्द पाळला असून माऊलीचे आशीर्वाद कायमपणे त्यांच्या पाठीशी राहतील असे सांगून विठ्ठल मंदिर ट्रस्टीत सहभागी होऊन काम करावे अशी विनंती केली.


प्रारंभी विठ्ठल मंदिर ट्रस्ट समिती, ग्रामपंचायत पानगाव, भाजपा पानगाव यांच्यावतीने आ. कराड यांचा सत्कार करून स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबुराव कस्तुरे यांनी केले तर शेवटी सुकेश भंडारे यांनी उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी वामनराव संपत्ते, भागवत गीते, गेटू आप्पा हलकुडे, शिवाजीराव जाधव, लक्ष्मण भंडारे, गोपाळ शेंडगे, नाथराव गीते, सुरेश बुड्डे, रामभाऊ भंडारे, मारुती गालफाडे, नागनाथ फुले, सुरेंद्र हरिदास, दत्ता आंबेकर, भागवत बनसोडे, बंडू केंद्रे, रमाकांत लहाने, बालाजी बच्चेवार, बालाजी केंद्रे, योगीराज शिरसाट, गोविंद हरिदास, शफीक पठाण, रमाकांत वाघमारे, इस्माईल मणियार, वैजनाथ मोटाडे, हरिकृष्ण गुरले, राणी मोटाडे, शिवकन्या गंनगने, इलाई शेख, वैजनाथ मोटाडे, राहुल मोटाडे, सतीश भंडारे, दिगंबर येडले यांच्यासह पानगाव आणि परिसरातील भावीक भक्त महिला पुरुष भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]