19.2 C
Pune
Tuesday, December 24, 2024
Homeठळक बातम्यापवार साहेबाविषयी असंवैधानिक भाषा वापरल्‍यास अटक मात्र अमृता फडणवीस यांना असभ्‍य बोलणारे...

पवार साहेबाविषयी असंवैधानिक भाषा वापरल्‍यास अटक मात्र अमृता फडणवीस यांना असभ्‍य बोलणारे मोकाट

माजीमंत्री आ.निलंगेकरांचे महाविकास आघाडी सरकारच्‍या दुटप्‍पी धोरणावर टिकास्‍त्र

लातूर/प्रतिनिधी:-छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर सरकार चालवत असल्‍याचा दावा करणा-या महाविकास आघाडी सरकारच्‍या काळात पवार साहेबाविषयी महिलांनी असंवैधानिक भाषा वापरल्‍यास त्‍यांना तात्‍काळ अटक करण्‍यात येते.मात्र अमृता फडणवीस यांच्‍या सारख्‍या महिलांबाबत सातत्‍याने असभ्‍य भाषा वापरणारे मोकाट कसे ? असा प्रश्‍न उपस्थित करत माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी महाविकास आघाडी सरकारच्‍या दुटप्‍पी धोरणावर टिकेचे आसूड ओढले आहेत.

सध्‍या महाराष्‍ट्रात वेगळया पध्‍दतीने गुन्‍हे दाखल करण्‍याची परंपरा महाविकास आघाडी सरकारच्‍या कार्यकाळात सुरू झाले असल्‍याचे सांगत माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी समाज माध्‍यमांत कोणी टीका केली तर त्‍यांच्‍यावर अनेक ठिकाणी गुन्‍हे दाखल करण्‍याची रीत सुरू झाली असल्‍याचे सांगितले.काही दिवसापूर्वीच केतकी चितळे या तरुणीने एक कविता फेसबुकवर पोस्ट केली आणि तिच्‍यावर राज्‍यात विविध ठिकाणी गुन्‍हे दाखल झाले. भाषेवर आक्षेप नोंदवत सदर भाषा असंवैधानिक असल्‍याचा दावा करत तिला अटकही करण्‍यात आलेली आहे. अदयाप तिची सुटका झालेली नाही.संसद सदस्‍य नवनीत राणा यांच्‍यासोबत देखील असाच प्रकार घडला आणि त्‍यांनाही १५ दिवस तुरूंगात काढावे लागले.आपल्‍या नेत्‍यावर आक्षेपार्ह भाषेत कोणी टीका केली तर त्‍याला अशाच पध्‍दतीने अडकावयाचे असे ठरविले जाऊ लागले आहे.

त्‍यांच्‍या नेत्‍यांनवर टीका झाल्‍यास गुन्‍हे दाखल करून तुरूंगात टाकण्‍याचा पराक्रम महाविकास आघाडी सरकारकडुन होवू लागल्‍याचे सांगत माजीमंत्री आ.निलंगेकर यांनी हाच न्‍याय विरोधी पक्षातील नेते किंवा महिलांबाबत असभ्‍य भाषा बोलल्‍यास का लागु होवू नये ? असा प्रश्‍न उपस्थित केला आहे.यापूर्वी अमृता फडणवीस यांच्‍यावर असभ्‍य भाषेत सातत्‍याने टीका करण्‍यात आली. एका स्‍त्री म्‍हणुन त्‍यांच्‍यासाठी योग्‍य भाषा वापरली गेली नाही. अतिशय खालच्‍या स्‍तरावर त्‍यांच्‍यावर टीका करण्‍यात आली. समाज माध्‍यमांवर सुध्‍दा अशाच पध्‍दतीची टीका झाल्‍याचे सर्वांनीच पाहिले आहे.काही दिवसापूर्वीच संभाजीनगर येथील सभेत संजय राऊत यांनी केंद्रीयमंत्री स्‍मृती इराणी यांच्‍याबाबत जाहीर भाषणात अशाच पध्‍दतीची असभ्‍य भाषा वापरकी मात्र या दोन्‍ही महिलांवर असभ्‍य भाषेत टीका करणारे अद्याप मोकाटच असल्‍याचे माजीमंत्री आ.निलंगेकर यांनी निदर्शनास आणून दिले.जर जेष्‍ठ नेत्‍यावर टीका करणारी महिला कायदयाच्‍या कचाटयात अडकवली जात असेल तर महिलेवर असभ्‍य भाषेत टीका करणा-या व्‍यक्‍तींवरही कार्यवाही व्‍हायलाच हवी,अशी मागणी माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारचे दुटप्‍पी धोरण असल्‍याने त्‍यांच्‍याकडुन अमृता फडणवीस यांच्‍यासारख्‍या महिलेबाबत असभ्‍य भाषा बोलली तरी कार्यवाही होत नसल्‍याची टिका केली.

 छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या आदर्शावर आम्‍ही सरकार चालवत आहोत असे सांगणारे महाविकास आघाडी सरकार नेमके कोणाच्‍या इशा-यावर चालत आहे हे समजत नाही असे सांगून छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या राज्‍यात महिलेकडे वाकडया नजरेने बघणा-यांचे डोळे काढण्‍यात येत होते. मात्र महाविकास आघाडी सरकार महिलांवर असभ्‍य भाषेत टीका केली तरी शांत का आहे ?असा प्रश्‍न माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी या निमित्‍ताने उपस्थित केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]