38 C
Pune
Thursday, April 24, 2025
Homeठळक बातम्या*पञकार रामचंद्र ठिकणे , फोटोग्राफर छोटूसिंग रजपूत राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्काराने सन्मानित*

*पञकार रामचंद्र ठिकणे , फोटोग्राफर छोटूसिंग रजपूत राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्काराने सन्मानित*

इचलकरंजी 🙁 प्रतिनिधी )-माणकापूर येथे निसर्गराजा ग्रुपच्या वतीने ग्रामदैवत मलकारसिध्द याञा व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वस्ञनगरीतील जेष्ठ पञकार रामचंद्र ठिकणे यांना राज्यस्तरीय पञकार भूषण प्रेरणा पुरस्कार व जेष्ठ फोटोग्राफर छोटूसिंग रजपूत यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट प्रेस फोटोग्राफर प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या पुरस्काराचे वितरण उद्योगपती , साहित्यिक वसंत सुतार,माजी सरपंच सदाशिव कोळी , सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय मांजरे ,उद्योजिका सौ.संजनकुमारी सुतार , सेवानिवृत्त मेजर भिमराव नराटे , कवयित्री सौ.सुवर्णा पवार , रावसाहेब भोसले यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी सामाजिक, पञकारिता, साहित्य , शैक्षणिक, साहित्य, उद्योग – व्यवसाय ,कला , क्रीडा अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नजमा शेख,पञकार तानाजी बिरनाळे ,सौ.नंदा नार्वेकर , डॉ.ओंकार निंगनुरे ,शिवानी मोरबाळे ,अभिनव सुतार यांच्यासह विविध व्यक्तींना देखील राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमास श्रीमती नंदिनी कदम ,संजय सासणे ,बाबू अपराज , सखाराम जाधव ,कवि सरकार ,मोनिका जाधव यांच्यासह विविध मान्यवर ,पुरस्कार प्राप्त व्यक्ती,ग्रुपचे सर्व पदाधिकारी, सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वागत व प्रास्ताविक निसर्गराजा ग्रुपचे अध्यक्ष पञकार शिवाजी येडवान यांनी केले.सूञसंचालन सात्ताप्पा सुतार यांनी तर आभार प्रदर्शन ग्रुपचे उपाध्यक्ष विठ्ठल काटकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]