पंडित दीनदयालजी उपाध्याय यांना
आमदार. रमेशआप्पा कराड यांच्या कडून विनम्र अभिवादन
लातूर दि. ११-
प्रतिभाशाली विचारवंत मानवतावाद आणि अंत्योदय यासारख्या सर्वसमावेशक विचाराचे प्रणेते त्यागमुर्ती श्रद्धेय पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या स्मृतिदिनानिमित्त भाजपाचे आमदार रमेश आप्पा कराड यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
याप्रसंगी भाजपा कार्यालय निर्माण प्रदेश संयोजक भाऊराव देशमुख, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर, बुथ रचना जिल्हा संयोजक तुकाराम गोरे, ओबीसी मोर्चाचे मराठवाडा संपर्क प्रमुख डॉ बाबासाहेब घुले, जिल्हा उपाध्यक्ष सतीश आंबेकर, रेणापुर तालुका अध्यक्ष दशरथ सरवदे, भैरवनाथ पिसाळ, रमाकांत फुलारी, अशोक सावंत यांच्यासह अनेक जण होते.