पत्रकारांनी समाजाचे देणे लागतो या भावनेतून सकारात्मक पत्रकारिता करावी- ऋषिकेशदादा कराड
लातूर दि.१०-पत्रकार समाजाचा तिसरा डोळा असून समाजाला योग्य दिशा देण्यासाठी प्रयत्न करावेत आजच्या ब्रेकिंग न्यूज च्या काळात चांगले उपक्रम दुर्लक्षित होता कामा नये याची काळजी घेऊन सकारात्मक पत्रकारिता करावी असे प्रतिपादन भाजयुमोचे प्रदेश सचिव तथा युवा नेते ऋषिकेशदादा कराड यांनी केले.
राजमंत्र न्यूज चैनल च्या वतीने पत्रकार दिनाच्या निमित्ताने रेणापूर येथे मंगळवारी परमपूज्य विद्यानंद बाबा महाराज यांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा नेते ऋषिकेशदादा कराड हे होते तर याप्रसंगी भाजपाचे अनिल भिसे, अँड. दशरथ सरवदे, रेणापूरचे पहिले नगराध्यक्ष अभिषेक अकनगिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे बालाजी कदम शिवसेनेचे रविकांत चव्हाण, अमर चव्हाण, शिला आचार्य, इंदुताई ईगे, महेंद्र पिपळे राजमंत्रचे संपादक सुधाकर फुले यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार सुरेश पाटील नेत्रगावकर, दत्ता कुलकर्णी पानगावकर, मंगेश डोंगरजकर यांना जीवन गौरव तर पत्रकार चंद्रकांत कातळे, रफिक शिकलकर, अहिल्या कसपटे यांना दर्पण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रिंट मीडियात जो आनंद होता तो आज राहिला नाही, मात्र डिजिटल जमान्यातही प्रिंट मीडिया टिकून आहे असेही ऋषिकेश कराड यांनी बोलून दाखवले तर यावेळी मार्गदर्शन करताना परमपूज्य विद्यानंद बाबा महाराज गातेगावकर म्हणाले की, पत्रकारिता समाजाचे हित करण्यासाठी स्वतः स्वीकारलेली जबाबदारी आहे. त्यांच्या कार्याने शून्यातून विश्व होऊ शकते चुकीचे कार्य झाले तर एखाद्याचे जीवनही उध्वस्त होऊ शकते. स्तुती प्रिय काळ आहे सत्य प्रिय नको झाली असून दर्पण म्हणजे आरसा, जो खोटं बोलत नाही तेव्हा पत्रकारांनी समाजाच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात. सत्य जगासमोर आणण्याचे आणि सत्य स्वीकारण्याची ध्यैर्य दाखवावे असे बोलून दाखवले. प्रारंभी दशरथ सरवदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सुधाकर फुले यांनी प्रास्ताविक केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृतेश्वर स्वामी यांनी केले शेवटी विष्णू आचार्य यांनी आभार मानले या कार्यक्रमास अनेक जण मोठ्या संख्येने उपस्थित होते.