सामान्य ते असामान्य प्रवास इच्छाशक्तीच्या जोरावर साध्य करता येतो __न्यायमूर्ती शिवकुमार डिग्गे
लातूर ( वृत्तसेवा ). -लातूर जिल्हा वकील मंडळाच्या वतीने विधी क्षेत्रातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आलेले आहे.आज परीक्षार्थी विधीज्ञाना मार्गदर्शन करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री शिवकुमार जी डिग्गे उपस्थित होते.
विधी क्षेत्रातील स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी वेळेचे योग्य नियोजन,दृढ निश्चय, सातत्य, प्रयत्नाची पराकाष्ठा केल्यास यश हमखास मिळते. स्पर्धा परीक्षेत यश नमिळाल्यास खचून न जाता चागला वकील, नागरिक होण्याचा प्रयत्न करा.
वकिली व्यवसायास स्वातंत्र्य पूर्व काळापासूनची फार मोठी उज्वल परंपरा लाभलेली आहे, स्वतः ला सिद्ध करा. सर्वसामान्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचे सामर्थ्य वकिली व्यवसायात आहे ,त्यामुळे सर्वसामान्य व्यक्ती साठी सदैव कार्यरत रहावे असे विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अँड शरद इंगळे होते तर व्यासपीठावर उपाध्यक्ष अँड अनंत खांडेकर, अँड मनिषा दिवे पाटील, सचिव अँड प्रदिपसिंह गंगणे, ग्रंथालय सचिव अँड विजय साबळे, सहसचिव अँड नरेश कुलकर्णी, अँड तृप्ती इटनकर, कोषाध्यक्ष अँड रोहित सोमवंशी, कार्यकारिणी सदस्य अँड धनराज नागरगोजे , अँड वाहेदअली सय्यद, अँड अतिक शेख आदी सह मोठया संख्येने परिक्षार्थी विधीज्ञ, विधिज्ञ उपस्थित होते
कार्यक्रमांचे सूत्रसंचालन अँड आनंद खांडेकर यांनी केले तर प्रास्ताविक अँड प्रदिपसिंह गंगणे, आभार अँड नरेश कुलकर्णी यांनी मानले आहे