प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन
इचलकरंजी ता.१४, संसदीय लोकशाही,धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद, सामाजिक न्यायावर आधारित समाजवाद आणि अलिप्ततावाद ही थोर स्वातंत्र्यसैनिक व भारताचे पहिले पंतप्रधान पं.नेहरू यांच्या विचारातून निर्माण झालेल्या मॉडेलची ठळक वैशिष्ट्ये आहेत.आज धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाऐवजी सांस्कृतिक राष्ट्रवाद मांडला जाऊ लागला आहे.त्याला पोषक व पूरक वातावरण पद्धतशीरपणे भांडवली शक्ती तयार करत आहेत.समाजवाद आणि अलिप्ततावाद यांचे आवाज दाबून टाकण्याचा ,त्यांना क्षीण करण्याचा प्रयत्न होतो आहे.अशा वेळी नेहरूंच्या लोकशाही समाजवादातील काळाला उपयुक्त ठरणारे विचार पुढे आणण्याची गरज आहे.ते नेहरू प्रारूप पुढे नेण्याचा प्रयत्न नेहरू यांचे पणतू राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतून होत आहे हे स्वागतार्ह आहे ,असे समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.ते समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालय यांच्या वतीने आयोजित पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या १३३ व्या जन्मदिनी अभिवादन करतांना बोलत होते.प्रारंभी.बाबासो कोळी यांच्या हस्ते पंडित नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी शशांक बावचकर ,सौदामिनी कुलकर्णी,नंदा हालभावी,अश्विनी कोळी, विनोद शिंदे ,देवगोंडा गायकवाड ,प्रताप जाधव, प्रदीप यादव, शिवाजी कदम, सुनील रावळ, रुझाय डिसोजा, धोंडीराम जाधव,संदीप कुरणे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.