नुकसान भरपाई द्यावी- मागणी

0
246

महामार्गा लगतच्या नाली अभावी शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान; नुकसान भरपाईची मागणी 

केज / प्रतिनिधी खामगाव- सांगोला या महामार्गाच्या रस्त्याच्या नाल्या न बनविल्यामुळे साळेगाव येथील रस्त्या लगतच्या शेतकऱ्याच्या सोयाबीन पिकाचे पूर्णतः नुकसान झाले आहे.

याबाबतचे सविस्तर वृत असे की,

केज तालुक्यातील साळेगाव येथून गेलेल्या खामगाव- सांगोला या महामार्ग क्र एनएच-५४८-सी लगत साळेगाव येथे नाल्या नसल्यामुळे येथील शेतकरी सय्यद अकबर पटेल, सय्यद रफअत व सय्यद शोएब या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात पेरलेले सोयाबीन पूर्णतः पिवळे पडून उध्वस्त झाले आहे. त्यामुळे त्यांचे सुमारे अडीच ते तीन लाख रु. चे नुकसान झाले आहे. या बाबत नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या नुकसानीला जबाबदार या महामार्गाचे काम करणारी मेघा कंपनी जबाबदार असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

चौकट-

“आमच्या शेतालगत नाली खोदली असती तर रस्त्यावरचे पाणी शेतात आले नसते व त्यामुळे माझ्या उभ्या सोयाबीन पिकाचे नुकसान झाले नसते.”

– सय्यद अकबर पटेल, शेतकरी

” साळेगाव येथील महामार्गलगत नाल्या बांधकाम करण्या संदर्भात आम्ही वेळोवेळी महामार्ग प्राधिकरण आणि मेघा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे. परंतु अद्याप त्यानी प्रतिसाद दिला नाही.”

— कैलास जाधव, सरपंच साळेगाव

” जर मागणी करूनही महामार्ग प्राधिकरण व संबंधित कंपनीही नाल्या, डिव्हायडर व इतर अपूर्ण कामाकडे दुर्लक्ष करीत असेल तर या साठी रस्ता रोको आंदोलन केले जाईल.

—- रिपाईं केज तालुका अध्यक्ष .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here