29 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeशैक्षणिक*‘नीट’च्या यंदाच्या निकालातही आयआयबी हिट.. !*

*‘नीट’च्या यंदाच्या निकालातही आयआयबी हिट.. !*

विक्रमी कामगिरीसह तीनही विषयात आयआयबी पॅटर्न ठरला अव्वल, अनिमेश राऊत ६९२ गुणांसह प्रथम स्थानावर..; यावर्षी ठरतील मागच्या वर्षी पेक्षा अधिक विद्यार्थी ‘एमबीबीएस’ साठी पात्र●

नांदेड, ता.१० ः

काही बाबतीत मराठवाड्यात मागासले पणा असेलही, परंतु गुणवत्तेत मराठवाडाच सरस असल्याचे नुकताच लागलेल्या ‘निट’च्या गुणवत्तापूर्ण निकालाच्या उज्वल परंपरेतून सिद्ध झाले आहे. या निकालामुळे ‘नीट’चे नांदेड-लातूर पॅटर्न म्हणून देशाच्या नजरा पुन्हा एकदा मराठवाड्याकडे वळल्या आहेत. आणि यातून नीट’म्हणजेच ‘आयआयबी’ असे समिकरण पुन्हा एकदा सिद्ध झाले. त्यामुळे ‘नीट’ साठी आयआयबी पॅटर्न याही वर्षी हिट ठरला आहे

देशभरातील वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या सामाईक प्रवेशासाठी ‘निट’ परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत नांदेडच्या ‘आयआयबी’ने मागील वर्षीच्या ‘नीट’ परीक्षेच्या आपल्याच निकालाची परंपरा खंडीत केली. व पुन्हा एकदा ‘नीट’ परीक्षेत या वर्षी ही अव्वल स्थान काबीज केले आहे. या परीक्षेत आयआयबीचा अनिमेश राऊत ६९२ गुणांसह प्रथम तर पारस सूर्यवंशी ६९०, श्रुती वीर ६९०, आदित्य केंद्रे ६९० ,गौरव शिंदे ६८५, सौरभ दुघे ६८१, सक्षम करांडे ६८०, हर्षल बोकडे ६८० असे गुण प्राप्त करत यावर्षीच्या नीट च्या निकालात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे यासोबतच अवघड समजल्या जाणाऱ्या फिजिक्स विषयात गौरव शिंदे, अन्वेष गंगेवार, शर्वरी कवलकर,शिवम सुर्यवंशी आदी विद्यार्थ्यांनी १८० पैकी १८० गुण प्राप्त केले आहेत यासोबत फिजिक्स विषयातच १४ विद्यार्थ्यांनी १७५ पेक्षा अधिक गुण तर तब्बल ४४ विद्यार्थ्यांनी १७० पेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत ..

याशिवाय केमिस्ट्रीत दोन विद्यार्थ्यांनी १७५ पेक्षा अधिक गुण मिळविले तर तब्बल ८ विद्यार्थ्यांनी १७० पेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत यासोबतच बायलॉजी त दोन विद्यार्थ्यांनी ३५६ व ३५५ असे गुण प्राप्त केले आहेत त्याचबरोबर ७२० पैकी ६०० पेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांत आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार १४६ विद्यार्थी आहेत तर ३२७ विद्यार्थ्यांनी ५०० पेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत..

मागील वर्षी आयआयबीचे १४७० पेक्षा अधिक विद्यार्थी ‘एमबीबीएस’ साठी पात्र ठरले होते. तर या वर्षी मागील वर्शी पेक्षा अधिक विद्यार्थी एमबीबीएस साठी पात्र ठरतील असा आशावाद आयआयबी टिमच्या वतीने व्यक्त करण्यात आला .

आजचे निट परिक्षेच्या निकालातील हे दैदिप्यमान यश प्राप्त करण्यासाठी आयआयबीने वर्षभरापासून निट परीक्षेची तयारी करुन घेण्यास सुरुवात केली होती. यामध्ये निट परीक्षेचे नियम, बारकावे, परीक्षा केंद्रावरील वेळेचे नियोजन, हॉल तिकीट, ड्रेस कोड या साराख्या बारीक सारीक गोष्टीचे नियोजन विद्यार्थ्यांनकडून वर्षभर करुन घेत परीक्षा आणि अभ्याक्रमात सातत्य टिकवून ठेवले होते. इतकेच नव्हे तर वर्दळीच्या ठिकाणच्या परीक्षेकेंद्रावर परीक्षा देतांना कुठली काळजी घ्यावी यासाठी शहरातील वर्दळीचे ठिकाण निवडून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनकडून निट परीक्षेचा सराव करुन घेण्यात आला होता.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]