सीसीटीव्ही म्हणजे पोलिसांचा तिसरा डोळा अनेक गैर प्रकाराला आळा बसणार,पोलिसांना होणार मदत
निलंगा-(प्रतिनिधी)-वाढत्या चोरीच्या घटना,बेशिस्त चालणारे वाहने,शहरात होणारी वाहतुकीची कोंडी पोलिसांची अपुरी संख्या,वाहनांची दिवसेंदिवस वाढती संख्या पाहता या सर्वच घटनांना पायबंद घालण्यासाठी सध्याच्या उच्च हाय टेक्नोलाॅजीचा वापर होत आहे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी निलंगा शहरात महत्त्वाच्या ठिकाणी उच्च प्रतिचे सीसीटीव्ही बसवण्यात आली असून आता निलंगा शहर चोविस तास चोविस कॅमेर्याच्या नजर कैदेत राहात आहे.
निलंगा शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून कर्नाटक सिमेलगतचे हे शहर असल्याने याभागातून अनेक गैरप्रकाराच्या घटना घडतात.याचा छडा लागावा म्हणून अनेक दिवसापासून शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे अशी मागणी करण्यात येत होती.कॅमेरे बसवण्यात यावे अशी मागणी करण्यात येत होती.याची दखल घेत माजी पालकमंञी तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी शहरातील मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याबाबत निधीही उपलब्ध करून दिला होता.शहरातील छञपती शिवाजी महाराज चौक,जिजाऊ चौक,सराफ लाईन,कासारशिरसी मोड,उदगीर मोड,दत्तनगर चौक,आनंदमुनी चौक यासह अन्य ठिकाणी अतिशय उच्च प्रतिचे 24 कॅमेरे बसवण्यात आले आहेत.यासाठी जवळपास 25 लाख रूपयाचा खर्च करण्यात आला आहे.सर्वच कॅमेर्याची एकञित जोडणी राहावी यासाठी आठ जंक्शन तयार करण्यात आले असून ज्याठिकाणी अधिक प्रमाणात गर्दी आहे म्हणजेच हाडगा नाका,छञपती शिवाजी महाराज चौक व जिजाऊ चौक येथे 360 डिग्रीमध्ये फिरते कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

याठिकाणी ध्वनीक्षेप (स्पीकर)सिस्टीमव्दारे एकाच वेळी पोलिस ठाण्यात बसून सूचना देण्यात येणार आहेत.हे सर्वच कॅमेरे पोलिस ठाण्यात संलग्न केल्याने शहरातील हालचालीवर आता पोलिसाची नजर राहणार आहे.यामुळे राञीच्या होणार्या चोरीच्या घटना,ट्रॅफीक वाहनाची कोंडी अशा घटना टळल्या जाणार आहेत.हे कॅमेरे 24 तास सुरू असून यामुळे चोरीच्या घटनेचा सुगावा यानिमित्ताने त्वरीत लागणार आहे.
उर्वरीत ठिकाणीही लवकरच कॅमेरे..
शहरातील दापकावेस,बॅंक काॅलनी,जुने पोलिस ठाणे यासह आदी भागात आणखी सीसीटीव्ही कॅमेर्याची आवश्यकता लक्षात घेऊन दहा लाख रूपयाचा निधी आमदार निधीतून देण्यात येणार असल्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांनी जाहीर केले आहे.त्यामुळे आता भविष्यात संपूर्ण शहरातील मुख्य ठिकाणी सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली येणार आहेत.
” माजी पालकमंञी तथा आ.संभाजीराव पाटिल निलंगेकर यांनी आश्वासित केल्याप्रमाणे शहरातील प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.हे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चांगले पाऊल असून ही यंञणा पोलीस स्टेशनकडे हस्तांतरण करण्यात आली आहे.लवकरच उर्वरित ठिकाणी आणखी कॅमेरे बसवून संपूर्ण शहर सुरक्षित राहावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत असे नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांनी सांगितले.”
” सीसीटीव्ही कॅमेर्यामुळे गुन्हेगारी व वाहतुक बेशिस्तीला आळा बसणार असून शहरातील मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून त्याचे पुर्ण केंद्र निलंगा पोलिस ठाणे आहे.येथे मोठी टिव्ही असल्याने शहरातील बारीकसारीक घटना याचठिकाणी बसून दिसत आहेत.यामुळे 24 तासातील एखाद्या घटनेचा डाटा पहायला मिळणार आहे असे पोलिस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ यांनी सांगितले.