विख्यात कवी , संपादक सतीश काळसेकर गेले
रायगड :विख्यात कवी, संपादक आणि सामाजिक कार्यकर्ते सतीश काळसेकर यांचं शुक्रवारी रात्री पेण येथील आपल्या घरी झोपेतच हृदयविकाराने निधन झाले.. ते ७८ वर्षांचे होते..
वाचणारयांची रोजनिशी लिहून थेट वाचकांशी संवाद साधणारया काळसेकर यांनी कविता लेखन, अनुवाद, गद्य लेखन, संपादन अशा क्षेत्रात मुक्त मुशाफिरी केली.. वाचणारयांची रोजनिशीला २०१४ मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता..
मुळचे वेंगुर्ले येथील असलेले काळसेकर यांनी मुंबईत वास्तव्य होते.. सध्या ते पेण येथे राहात होते.. त्यांच्या निधनाने नव कवींचा एक चांगला मार्गदर्शक हरवल्याची भावना व्यक्त होत आहे..