चुरशीच्या लढतीत नाशिकचा हर्षवर्धन ठरला
महाराष्ट्र कुस्ती महा-वीर किताबाचा मानकरी
लातूर दि ०१ : नाशिक येथील हर्षवधन सदगीर आणि सोलापूरचा जयदीप पाटील यांच्यातील चुरशीच्या लढतीत जयदीप पाटील याने टांग डाव मारायचा प्रयत्न केला परंतू हप्ते भरून हर्षवर्धन याने चितपट निकाली कुस्ती करून महाराष्ट्र कुस्ती महा-वीर हा खुल्या गटातील किताब मिळविला. एक लक्ष रुपये रोख, चांदीची गदा, सुवर्णपदक व प्रशस्तीपत्रक मान्यवरांच्या हस्ते देऊन त्याचा सत्कार करण्यात आला. विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रधर्म पूजक – दादाराव कराड स्मृती राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महा-वीर स्पर्धा रामेश्वर (रूई), ता.जि. लातूर येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धा गेल्या १५ वर्षापासून भरविण्यात येत आहेत.
महाराष्ट्र कुस्ती महा-वीर कुस्ती स्पर्धेत सोलापूर येथील जयदीप पाटील यांनी उपविजेते पद मिळविले. त्यांना रौप्यपदक व रोख पंचाहत्तर हजार रुपयाचे पारितोषिक देण्यात आले. पुणे येथील प्रमोद सुळ याला तिस-या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यास पंन्नास हजार रुपये रोख व कांस्य पदक, देण्यात आले. चतुर्थ क्रमांकावर कुर्डृवाडी येथील सुहास गोडगे याला पंचेवीस हजार रुपये रोख व पदक देण्यात आले. या स्पर्धेमध्ये एकूण २०० पेक्षा अधिक मल्लांनी भाग घेतला होता.
हिंदकेसरी दीनानाथ सिंग, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, रामेश्वरचे माजी सरपंच श्री. तुळशीराम दा. कराड, श्री. काशीराम दा. कराड, आ. श्री. रमेशअप्पा कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश तु. कराड, डॉ. हनुमंत कराड, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे विलास कथुरे, श्री. राजेश कराड, डॉ. पी.जी.धनवे व वस्ताद पै. निखिल वणवे यांच्या हस्ते विजेत्या मल्लांना पारितोषिके देण्यात आली.
वजन गटातील विजेते (प्रथम क्रमांक – सुवर्णपदक, द्वितीय क्रमांक – रौप्य पदक, तृतीय क्रमांक – कांस्यपदक व रोख रक्कम) वजन गट प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांक पुढीलप्रमाणे – ८६ किलो (रवी चव्हाण-पुणे ४० हजार ), (कौतुक डाफळे- कोल्हापूर ३० हजार), (अविनाश गावडे-पुणे २५ हजार), (एकनाथ बेद्रे-सोलापूर २० हजार) ७४ किलो (अभिजीत भोसले-सोलापूर २५ हजार) (मशिद शेख- कुर्डुवाडी २० हजार), (विष्णू तातपूरे- लातूर १५ हजार ), (चौतन्य साबळे- पुणे १० हजार) ७० किलो (विकी कारे-पुणे १५ हजार), (महेश तातपूरे –रामेश्वर १२ हजार), (अमर मळगे- सोलापूर १० हजार), (सुदेश बागल – कुर्डूवाडी ८ हजार) ६५ किलो (निखील पवार – लातूर १२ हजार ), (पवण जेण्णर- नाशिक १० हजार), (सद्दम शेख – कोल्हापूर ८ हजार), ( सुशांत पाटील – कोल्हापूर ५ हजार ) ६१ किलो (विजय डोंगरे-सोलापूर १० हजार), ( अतुल चेचरे – सोलापूर ७ हजार), (अविष्कार गावडे – पुणे ५ हजार), ( अनिकेत पाटील- कोल्हापूर ३ हजार) ५७ किलो (आकाश गड्डे – रामेश्वर ७ हजार), (धवल चव्हाण- धाराशिव ५ हजार), (विशाल सुरवसे- सोलापूर ३ हजार), (लहू चौरे- सांगली २ हजार).
७५ पेक्षा अधिक वर्षे वय असलेले अनेक मल्ल सहभागी झाले होते. या पैकी कमलाकर मुळे हे विजेते ठरले तर शिवाजी मोरे हे उपविजेते ठरले. या पैलवानांचा योग महर्षी स्वातंत्र्यसेनानी वै. रामचंद्र गोपाळ शेलार उर्फ शेलार मामा स्मृती-सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, रामेश्वरच्या मातीतून आज ना उद्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू निर्माण होतील. भारताच्या कुस्तीक्षेत्रामध्ये आपले नाव उज्वल करतील. कुस्ती या क्रीडाप्रकारात आपले मन आणि मनगट मजबूत होते. आजच्या तरुणांनी कुस्तीकडे वळणे गरजेचे आहे. श्री. बाबा निम्हण यांनी स्पर्धेचे सूत्रसंचालन व धावते वर्णन केले. तर प्रा. डॉ. मंगेश तु. कराड यांनी आभार मानले.