निलंगा तालुक्यातील माकणी ( थोर ) येथे 225 व्या नाथषष्टी महोत्सवाची मोठ्यासंख्येने भाविक-भक्तांच्या साक्षीने उत्साहात समारोप
निलंगा,-( प्रशांत साळुंके )-
निलंगा तालुक्यातील माकणी ( थोर ) येथील प्रसिध्द जाज्वल्य देवस्थान असलेल्या मारोती संस्थानात आयोजित सद्गगुरू सांप्रदायिक धर्मपीठ औसा येथील परंपरागत प्रासादीक 225 व्या नाथषष्टी महोत्सवाची शनिवार (दि.26)रोजी उत्साहात सांगता झाली.
नाथ संस्थान औसा यांच्या वतीने गेल्या 224 वर्षापासून अखंडीत नाथषष्टी महोत्सवाचे वेगवेगळ्या ठिकाणी आयोजन केले जाते.यंदाचा 225 व्या महोत्सव माकणी ( थोर ) येथे दि.20 मार्च ते 26 दरम्यान साजरा झाला.नाथषष्टी महोत्सवात दैनंदिन सकाळी काकडा,श्रीविष्णू सहस्ञनाम,ग्राथराज ज्ञानेश्वरी पारायण,श्रीनाथ स्थापनेची पूजा,मल्यनाथ गाथ्यावरील भजन,चक्रीभजन,ज्ञानेश्वरी प्रवचन,किर्तन,हरीजागर व दैनंदिन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
सद्गगुरू गुरूबाबा महाराज औसेकर यांचे भव्यदिव्य चक्रीभजन सोहळ्याचे आकर्षण ठरले.शनिवारी नाथषष्टी महोत्सवाची गोपाळकाल्याने सांगता करण्यात आली,त्यावेळी काल्याचे पारंपारिक अभंग व खेळ खेळून दहीहंडी फोडण्यात आली.त्याप्रसंगी श्री नाथ संस्थानचे पाचवे पिठाधिपती सद्गगुरू श्री गुरूबाबा महाराज औसेकर,सद्गगुरू गहिनीनाथ महाराज औसेकर,मच्छिंद्रनाथ महाराज,श्रीनाथ महाराज,श्रीरंग महाराज,सिध्दराज महाराज,ज्ञानराज महाराज,चि.गितेश्वर महाराज यांच्यासह गोविंदराव माकणे,गिरीष पाटील,बालाजी शिंदे,कपिल माकणे व परिसरातील हजारोंच्या संख्येने भाविक-भक्तांची मांदियाळी याप्रसंगी दिसून आली.
यासोहळ्यात माजी खा.रूपाताई पाटील निलंगेकर,माजी पालकमंञी तथा लोकप्रिय आ.संभाजीराव पाटील निलंगेकर,काॅंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर,भाजपाचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर,माजी जि.प.उपाध्यक्ष भारतबाई दगडू सोळुंके,रघुनाथराव साळुंके,सुनिल साळुंके,प्रशांत साळुंके यांच्यासह अनेकांनी उपस्थित राहून सद्गगुरू गुरूबाबा महाराज औसेकर यांचे आशिर्वाद घेतले.या सोहळ्यातच गुरूबाबा महाराज औसेकर यांनी पुढील वर्षी 226 व्या नाथषष्ठी गुजरात राज्यातील व्दारका येथे संपन्न होणार असल्याचे जाहीर केले.