नयन यांनी सामाजिक चळवळ जिवंत ठेवण्याचे कार्य केले: ज्येष्ठ रंगकर्मी अतुल पेठे
नांदेड दि. १ (प्रतिनिधी)
काळ आणि अवकाशाचे अर्थ बदलले आहेत. माणसं जवळ येण्याऐवजी दूर जायला लागलीत.सगळीकडे अंधार पसरलेला असताना समाजात ही हिंसा थांबवणारा एक तरी माणूस असायला हवा. आजकाल चळवळी जिवंत नाहीत आवाज उठवणारी माणसं नाहीत. नयन बाराहाते यांनी सामाजिक चळवळ जिवंत ठेवण्याचे कार्य केले. आपण एका काळ्या काळात कालखंडातून जात असताना कलाकारांनी सजग राहावे असे आवाहन ज्येष्ठ रंगकर्मी अतुल पेठे यांनी नांदेड येथे केले.
नांदेड येथील चित्रकार नयन बाराहाते यांच्या जयंती निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमास या कार्यक्रमात त्यांनी नयन बाराहते यांच्या अनेक आठवणी सांगितल्या कालिदासाचा कलासक्तपणा व्याकुळपणा, ममत्व, सृष्टीशी नातं सांगणारे काव्य आणि कलेप्रतीचे असीम प्रेम नयन बाराहाते यांच्यात भरलेलं होतं. आज नयन नाहीत ही खंत आहे .परंतु त्यांनी दिलेली दृष्टी या नांदेड शहरातील सांस्कृतिक संचित निर्माण करेल असे सांगून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांचा आढावा घेतला.
सामाजिक सांस्कृतिक बंध आणि सद्यस्थितीतील वातावरण या अवस्थेत विवेकाची कास धरणे आवश्यक असल्याचे सांगितले .मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ चित्रकार प्रमोद कांबळे, सकाळचे संपादक संदीप काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या यावेळी प्रमोद कांबळे यांना नयन बाराहाते स्मृती पुरस्काराने गौरविण्यात आले. मानपत्राचे वाचन डॉ. विलास ढवळे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ लेखिका वृषाली किन्हाळकर यांनी केले .नयन बाराहाते यांच्या मनस्वी जगण्यातील यथार्थता त्यांनी सांगितली.दुर्दम्य इच्छाशक्ती असलेला आणि सगळी काम उत्कटतेने करणारा, गायन वादन आणि मैफिलीने फुलून येणारा त्याचा स्वभाव अशा अनेक पैलू त्यांनी विशद केले. नयन बाराहाते यांची कन्या सायली हिने यावेळी अत्यंत भावपूर्ण मनोगत व्यक्त केले.
यावेळी नितीन जोशी यांनी व्हिडिओ संदेश पाठवला. त्यात त्यांनी नयन एक तत्त्वज्ञान होतं असं सांगितलं. संपादक व विचारवंत संजय आवटे यांचं नव्या युगास सामोरे जाताना या विषयावर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यांना या कार्यक्रमास उपस्थित राहता आलं नाही. त्यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे नयन बाराहाते यांच्या स्मृतींना उजाळा देत या सगळ्यांच्या साक्षीने नयनला आठवायचं होतं. परंतु येता आलं नाही याबद्दल खंत व्यक्त करून सांस्कृतिक भुयार करणे महत्त्वाचे आहे .एका नव्या युगाच्या तयारीसाठी आपण तयार असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
सुरेश दादा गायकवाड ,संपादक राम शेवडीकर ,प्रफुल्ल कुलकर्णी ,डॉ. बबन जोगदंड ,लेखक श्रीकांत देशमुख, श्रीकांत देशमुख, मनोज बोरगावकर, डॉ.राम वाघमारे, आदी प्रभूतींची यावेळी उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे नेटके नियोजन सायली बाराहाते तिचे पती सुरेंद्र उर्फ सुरी व किशोर आटकोरे आणि मित्र परिवारांनी केले होते. उपस्थितांचे आभार शिवाजी अंबुलगेकर यांनी मानले.
………………..
चित्रकार कांबळे यांना पुरस्कार
यावेळी अहमदनगरचे चित्रकार प्रमोद कांबळे यांना पहिला नयन बाराहाते पुरस्कार प्रदान करण्यात आला स्मृतीचिन्ह रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप होते या पुरस्कारास उत्तर देताना त्यांनी नयन बाराहते यांच्या मैत्रीसंदर्भातील अनेक गोष्टी सांगितल्या .यावेळी त्यांचं मन भरून आलं. आदरांजली म्हणून नयन बाराहाते यांचं स्केच केलेले फोटो फ्रेम सायली हीस भेट दिली.
…………………………………………..
फोटो ओळ: चित्रकार नयन बाराहाते यांच्या जयंती औचित्याने पहिला ‘चित्रकार नयन बाराहाते’ पुरस्कार प्रमोद कांबळे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक अतुल पेठे, लेखिका वृषाली किन्हाळकर, संपादक व लेखक संदीप काळे, सायली बाराहाते.