धडाका सुरू. धडाका सुरू. धडाका सुरू.
काल शपथविधी झालेल्या सर्व नवनियुक्त मंत्र्यांनी आज कार्यभार सांभाळला असून एक अतिशय दिलचस्प माहिती मिळते आहे,जेंव्हा एक केंद्रीय मंत्री आपल्या मंत्रालयाचा चार्ज घेण्यासाठी आपल्या विभागात गेले तेंव्हा तिथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना काही प्रश्न विचारले,तेंव्हा मंत्र्याच्या स्वागताला हातात गुलाब पुष्प घेऊन थांबलेले कर्मचारी इकडे-तिकडे पहायला लागले.
बरं मंत्री महोदयांनी प्रश्नच तसा खतरनाक विचारला होता,
गुलाब पुष्प घेण्याआधी प्रश्न होता आपल्या मंत्रालयाचा देशाच्या जीडीपी मध्ये किती योगदान आहे,मागील दोन वर्षात किती रोजगार आपल्या मंत्रालयाने उपलब्ध केला.?गुलाबाचे फुल ठीक आहे पण तुमच्या हातात फाईल दिसत नाहीत,मंत्रालयाचा डेटा कुठे आहे,
अश्या प्रश्नाच्या फैरी मंत्र्या कडून आल्यावर एका कर्मचाऱ्यांने हिम्मत करून सर बरेच कर्मचारी त्यांच्या घरी लग्न असल्यामुळे सुट्टीवर आहेत ते परत आले की डेटा उपलब्ध करून देऊ असं उत्तरादाखल सांगितले.
या वर मंत्री महोदयांनी प्रतिप्रश्न करत किती कर्मचाऱ्यांच्या घरी लग्न आहे,अन कोण कर्मचारी लग्न अटेंड करायला गेले आहेत असं विचारल्यावर कर्मचाऱ्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते,
कर्मचाऱ्यांचे झालेले हाल पाहून मंत्री महोदयांनी सबुरी दाखवत रात्री पर्यंत सर्व डेटा उपल्बध करून घेऊन बैठकीस उपस्थित राहण्यास सांगितले,अन तुमचे प्रदर्शन चांगले नसेल तर मला नाईलाजाने सर्व कर्मचारी बदलावे लागतील अन त्या घटनेला तुम्हीच जिम्मेदारी असाल असं सांगून गुलाब पुष्प घेत स्मित हास्य करून आपल्या विभागाचा चार्ज घेतला.
नारायण राणे सारख्या मोठ्या व्यक्तीला छोटे मंत्रालय दिले असे मीडियात येऊन सांगणाऱ्या संजय राऊत यांना नारायण राणे आपल्या मंत्रालयाचा चार्ज घेताना कशी सुरुवात केली हे पाहून चक्कर आल्याशिवाय राहणार नाही,आज पहिला दिवस आहे नारायण राणे सारख्या क्षमता वान व्यक्तीला न सेनेने समजून घेतले न काँग्रेस ने,आता मंत्री पदी निवड होताच राणे व कोकण भाजपचा वनवास संपुष्टात येऊन सेनेच्या वनवासाला सुरुवात झाली एवढं मात्र नक्की.
संकेत रेड्डी