सौ.दीपशिखाताई धिरज देशमुख यांचे हार्दिक अभिनंदन…..
नुकताच आपण महिला दिन साजरा केला.यानिमित्ताने विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा सन्मान करून, त्यांना शुभेच्छा दिल्या.
समाजात पुरूषांच्या बरोबरीने नव्हे तर एक पाऊल पुढे जावून अनेक महिला स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करत असल्याचे आपल्या अवती भोवती आपण पाहत असतोत.
अशा कर्तबगार महिलांपैकी एक असलेल्या सौ.दीपशिखाताई धिरज देशमुख यांचा, महाराष्ट्राचे राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार देवून सन्मान केला गेला. “मीड डे” समुहाच्या वतीने देण्यात आलेल्या या पुरस्कारासाठी सौ.दीपशिखाताई देशमुख निश्चितच पात्र आहेत असे मी मानतो.
चित्रपट सृष्टीत एक महिला निर्माती म्हणून होतअसलेले त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे.सामाजिक उपक्रमात देखील त्यांचा सहभाग मोलाचा असतो.यासोबतच एक आई,या नात्याने त्यांच्या मुलांवर सामाजिक संस्कार घडवण्यासाठी त्या प्रयत्नशील असतात.
त्यांच्या व्यक्तिमत्वातील विविध पैलू लक्षात घेवून त्यांना राज्यपाल महोदयांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.
भविष्यात देखील त्यांच्या हातून अशाच पद्धतीने चांगले कार्य घडत राहो.यासाठी शुभेच्छा व पुरस्कारा बद्दल हार्दिक अभिनंदन.
राजू सी पाटील