18.3 C
Pune
Tuesday, December 24, 2024
Homeआंतरराष्ट्रीयदीपक वोरांच्या भाषणाने लातूरकर मंत्रमुग्ध !

दीपक वोरांच्या भाषणाने लातूरकर मंत्रमुग्ध !

माध्यम वृत्तसेवा
………………..


लातूर /प्रतिनिधी– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे विश्‍वगुरू ठरण्यासाठी भारत वाटचाल करीत आहे. भारताचे भविष्य उज्जवल असून, आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची मान उंचावली आहे. नवीन भारताचा उदय होत आहे, असा आशावाद पंतप्रधानाचे विशेष सल्लागार दीपक वोरा यांनी येथे एका कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केला.
रोटरी इंटरनॅशनलच्या उद्घाटन सत्रात प्रमुख अतिथी म्हणून वोरा बोलत होेते. कार्यक्रमाची सूरूवात व्याहति होम या मंगल हवनाने करण्यात आली. उत्सव आहे दातृत्वाचा, उत्सव आहे कर्तृत्वाचा उत्सव आहे आपल्या रोटरीचा… उत्सव कार्यकत्याच्या मेहनतीचा… ‘उत्सव’ ही थीम घेऊन आयोजित या दोन दिवसीय कॉन्फरन्सची लातुरात नुकतेच सूप वाजले. सांस्कृतिक सामाजिक, बौद्धिक, मनोरंजन आणि उद्बोधन अशा विविध कार्यक्रमाची रचना या कॉन्फरन्समध्ये करण्यात आली होती.


ते आले, त्यांना पहिले आणि त्यांनी जिंकले..! अशीच अनुभुती यावी असे भाषण दीपक वोरा यांनी करून सातारा, सोलापूर नगर सह संपुर्ण मराठवाड्यातून आलेल्या हजारो रोटेरीयनना जागेवर खिळवून ठेवले. त्यांच्या देशभक्तीपर भाषणाने सर्वजण मंत्रमुग्ध झाले होते. वोरा यांचे भाषण संपताच संपुर्ण सभागृहातील उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला आणि भारतामातेचा जयघोष केला. रोटेरीयनसाठी आजचा हा दिवस खरोखरच अविस्मरणीय होता असेच म्हणावे लागेल. ‘ मला देखील खूप आंनद वाटला ‘ असे मराठीत बोलून त्यांनीही उपस्थितांना दाद दिली.
लातूरच्या दयानंद सभागृहात उद्घाटनाच्या सत्रास मुरादाबाद येथील ज्येष्ठ विधिज्ञ गजेंद्रसिंह धामा, ममता धामा, सनदी अधिकारी जगदीश पाटील, विजयभाऊ राठी, डॉ. राजीव प्रधान, मोहन देशपांडे, इस्माईल पटेल, डॉ. दीपक पोफळे, नंदकुमार गादेवार, माजी आमदार वैजनाथ शिंदे, प्रा. बी. व्ही. मोतीपवळे, रोटरीचे पांतपाल डॉ. ओमप्रकाश मोतीपवळे, ऍड. सविता मोतीपवळे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.


‘भारत भाग्य विधाता ‘ या विषयावर दृकश्राव्याच्या माध्यामातून अत्यंत उद्बोधक प्रसंग, दाखले देत दीपक वोरा यांनी आपले भाषण रंजक केले. या देशाची ज्ञान संपदा ही हजारो वर्षा पासून चालत आलेली आहे. ही देण जगाने मान्य केली आहे. सुपर पावर म्हणून भारताकडे सगळे जग पहात आहे. हजारो वर्षापूर्वी महाभारतात आपण ज्ञानविषयी जागरूक होतो असा उल्लेख सापडतो. येथील नालंदा विश्‍वविद्यापीठ प्रसिद्ध होते. असा हा ज्ञान संपन्न भारत जग्गजेता होण्यास आता अवधी लागणार नाही. या देशातील युवा पिढीकडे संपूर्ण जग आशेने पहात आहे. त्यामुळे भारताचा भविष्यकाळ उज्जवल आहे. असे ते म्हणाले.
रोटरीचे प्रांतपाल डॉ. ओमप्रकाश मोतीपवळे यांनी आपल्या प्रास्ताविकात सेवाकार्याची माहिती दिली. पोलीओ निमूर्लन या विश्‍वव्यापी मोहिमेमुळे रोटरी क्लबची जगाला ओळख झाली. नुकताच डॉ. राजीव प्रधान यांच्या नेतृत्वाखाली काश्मीर मेगा मेडीकल पोजेक्ट घेण्यात आला. याला उत्तम प्रतिसाद मिळाला ४३ सर्जननी दोन हजार मेजर सर्जरी करण्याचा विक्रम केला अशी माहितीही त्यांनी दिली.


अकलूज येथील रोटेरीयन प्रवीण साठे यांनी आपल्या अविट बासरीवादनाने सर्वाना मंत्रमुग्ध केले. मेंबरशिप या विषयावर पॅनल डिस्कशन झाले. डॉ. दीपक पोफळे यांनी बहारदार सूत्रसंचालन केले. ‘रोटेरीयन यही हमारी पहचान है ‘ असे राजेंद्रसिंह धामा यांनी सांगत प्रांतपाल डॉ. ओमप्रकाश मोतीपवळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात रोटरीची वाटचाल चांगली चालू असून त्यांचे व त्यांच्या टीमचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. अशा शब्दात मोतीपवळे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. दुपारच्या सत्रात अंबाजोगाई रोटरी क्लबने ‘ माय माझी रोटरी ‘ हा नृत्यविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]