ऊस जळाला अन्र महावितरणकडून पांग फिटला..!
मलरडवाडी ( निटूर ) येथे शेतकरी व्दारकादास तापडीया यांचा दहा एकर ऊसाला आग.. लाखोंचे नुकसान
निलंगा,-( प्रशांत साळुंके )
-निलंगा तालुक्यातील मलरडवाडी ( निटूर ) येथील शेतकरी व्दारकादास गोवर्धनदास तापडीया यांच्या शेतातील विद्युत महावितरणकडून तारेच्या घर्षणामुळे दहा एकरवरील ऊस जळाल्याची घटना बुधवारी घडली.त्यात शेतकर्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.
निटूर येथील शेतकरी व्दारकादास गोवर्धनदास तापडीया यांच्या मलरडवाडी ( निटूर ) यांच्या शेतातून गेलेल्या विद्युत तारा अक्षरश:खाली लोंबकळल्या अवस्थेत आहेत.या भितीने शेतकर्यांनी संबंधितांना वेळोवेळी महावितरण कार्यालयाला तोंडी तक्रार दिली असता त्याची दखल कसलीही झाली नाही.विद्युत पोल आणि तारा या कमकुवत दर्जाच्या असल्याने कोणत्याही वेळी तुटू शकतात.त्यामुळे शेतकर्यांच्या शेतातील मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.याची निटूर विद्युत महावितरण उपकेंद्र 33/11 कार्यालयानेही पाहणी केली होती.माञ,याकडे महावितरणने दुर्लक्ष केले.तक्रारीची दखल घेतली नसल्याचे शेतकर्यांने स्पष्टीकरण दिले आहे.
दरम्यान,बुधवारी विद्युत तारेच्या घर्षणामुळे लागलेल्या आगीत तब्बल दहा एकर ऊस जळून खाक झाला असून,शेतकर्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.त्यामुळे प्रशासनाने तात्काळ पंचनामा करण्याची मागणी शेतकरी व्दारकादास तापडीया यांनी केली आहे.
मागील वर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृृष्टीमुळे ऊसाच्या क्षेञात वाढ झाली आहे.त्यातच तालुक्यात सोळा महिने झाले तरी ऊसाला तोड मिळत नसल्याचे चिञ आहे.त्यातच आगीच्या घटनेमुळे शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाल्याचे चिञ सद्यस्थितीला दिसत आहे.म्हणून ऊस जळाला अन्र महावितरणकडून पांग फिटल्याची चर्चा सध्या खमंग चर्चिली जात आहे.