*लेखन यज्ञाचा सन्मान*
संस्कृत म्हणजे कठीण असा सर्वसाधारण समज. शालेय अभ्यासात केवळ गुणांसाठी ज्या विषयाचा अनेकजण विचार करतात, त्या संस्कृत भाषेत चांगली कारकीर्द घडविता येते, हे मंजूषा यांच्या साहित्य अकादमी पुरस्काराने सिद्ध केले. डॉ. प्रकाश आमटे यांच्यावरील ‘प्रकाशवाटा’ पुस्तकाचा संस्कृतमध्ये *‘प्रकाशमार्गाः’* असा अनुवाद मंजूषा यांनी केला आणि त्यावर साहित्य अकादमी पुरस्काराने मोहर उमटवली. मराठी साहित्याच्या संस्कृतमधील अनुवादाला पहिल्यांदाच हा सन्मान मिळाला आहे. मंजूषा मूळच्या मराठवाड्याच्या. त्यांचे वडील ‘एमएसईबी’मध्ये नोकरीला होते. तेही संस्कृतप्रेमी. आईचाही संस्कृतचा चांगला अभ्यास होता. अनेक सुभाषिते आई त्यांना ऐकवायची, अर्थ सांगायची. *दत्तात्रय कुलकर्णी* हे मंजूषा यांचे पणजोबा नामवंत लेखक होते. *त्यांनी रवींद्रनाथ टागोरांच्या अनेक रचना मराठीत आणल्या होत्या.* *‘विवाह संस्कार’* हे त्यांचे पहिले पुस्तक. *उखाणे हा मराठीतील लेखनप्रकार त्यांनी संस्कृतात आणला.* अनुवाद, काव्य, ललित, वैचारिक, चरित्र असे अनेक प्रकारचे लेखन, शिवाय *निवेदिका, सूत्रसंचालिका, एकपात्री प्रयोगही त्यांनी केले आहेत. संस्कृतमध्ये त्या व्याख्यानेही देतात.*
केवळ संस्कृत आणि मराठी नाही, तर हिंदीमध्येही लिखाण करतात. *हिंदीवरही मंजूषा यांचे प्रभुत्व आहे. त्यांची २५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत, तर २३ अजून प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.* सध्या त्या ‘कौटिलीय अर्थशास्त्र’ हिंदीत लिहीत आहेत. हा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
👇👇👇👇
आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.
*संपादक- गोपाळ कुळकर्णी*
*9422071177*