लातूर : लातूर येथील विख्यात अस्थिशल्य चिकित्सक तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अशोक पोद्दार यांना स्व. जन . अरुणकुमार वैद्य बहूउद्देशिय संस्था लातूर व संघर्ष युवा संघटना लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणाऱ्या डॉ. एपीजे कलाम आरोग्यरत्न राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
लातूरच्या वैद्यकीय क्षेत्रात महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याकामी डॉ. अशोक पोद्दार यांचे योगदान अतुलनिय असे राहिले आहे. आपल्या पोद्दार हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी आजपावेतो १४० हुन अधिक मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन करून वैद्यकीय व्यवसायात एक आदर्श निर्माण केला आहे.

या शिबिरांच्या माध्यमातून मोफत उपचारांसोबतच रुग्णांना मोफत औषधीही उपलब्ध करून देण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. केवळ एवढेच नव्हे तर दिशा प्रतिष्ठानसारख्या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून ते गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक अर्थसहाय्यही करण्याकामी अग्रेसर असतात. अशा या सर्वव्यापी व्यक्तिमत्वाच्या कार्याची दाखल घेऊन स्व. जन . अरुणकुमार वैद्य बहूउद्देशिय संस्था लातूर व संघर्ष युवा संघटना लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा राज्यस्तरीय आरोग्यरत्न पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार स्विकारल्याबद्दल पुरस्कार संयोजन समितीच्या वल्लभ तावरे, प्रा. डॉ. गणेश बेळंबे यांसह अनेक मान्यवरांनी डॉ. पोद्दार यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.