18.3 C
Pune
Tuesday, December 24, 2024
Homeताज्या बातम्या*ट्रेलरला एसटीला धडक; भीषण अपघातात चालक ठार*

*ट्रेलरला एसटीला धडक; भीषण अपघातात चालक ठार*

नवी मुंबई, ( प्रतिनिधी) मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर बंद स्थितीत उभ्या असलेल्या ट्रेलरवर पाठीमागून भरधाव वेगाने येणारी सोलापूर-अर्नाळा एसटी बस धडकल्याने झालेल्या अपघातात एसटी चालकाचा मृत्यू झाला. तर बसमधील १९ प्रवासी जखमी झाले. ही दुर्घटना आज पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास पनवेलमधील कोन गावाजवळ घडली. अपघातातील सर्व जखमींना एमजीएम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
अपघातात एसटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
एसटी चालकाचे नाव अभिमन्यू अच्युत गायके (३३) असे असून ते उस्मानाबादचे आहेत.
याबाबत माहिती अशी की, बस पनवेलजवळ आली असताना, कोन गावाजवळ मुंबईच्या दिशेने जाणारा ट्रेलर अचानक बंद झाल्याने तो दुसऱ्या मार्गिकेमध्ये उभा होता. पाठीमागून येणाऱ्या एसटीचालकाला ट्रेलर न दिसल्याने एसटी ट्रेलरवर जोरदार धडकली. या अपघातात एसटी चालक जबर मार लागल्याने जागेवरच मृत झाला. तर बसमधील एकूण १९ प्रवासी जखमी झाले. त्यात चार प्रवासी गंभीर असून त्यांच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार केले जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]