इचलकरंजी ; दि.१७( प्रतिनिधी ) –– बांधकाम व डिझाईन क्षेत्रात अल्पावधितच नावारुपाला आलेली बहुराज्यीय संचलीत टीम झेनित आर्किटेक्टस् एन्ड इंजिनिअर्स चे आर्किटेक्ट ऋषिकेश बसागरे व आर्किटेक्ट पूजा आलुरे- बसागरे यांना ग्लोबल आर्कीटेक्ट बिल्डर एवार्ड ( गाबा) हा आतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
बेस्ट आर्किटेक्ट फॉर कमर्शियल प्रोजेक्ट विभागातून या पुरस्कारासाठी या दोघांची निवड करण्यात आली. बैंकॉक येथे संपन्न झालेल्या एका शानदार सोहळ्यात स्टीफन ओहेम(सिंगापूर) व शिखा धिल्लन यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. पॉंचिसिरॉज, डॉ.पॉलपैट निल-यू-बॉन, व स्टीफन पब्ले हे निरनिराळ्या क्षेत्रातील प्रमुख यावेळी उपस्थितीत होते.
ग्लोबल आर्कीटेक्टस् एन्ड बिल्डर्स एवार्ड (गाबा ) ही एक आतरराष्ट्रीय संस्था असून रियल इस्टेटमधील व्यावसायिकांसाठी ही संस्था नवसंजीवनी देत असते.या पुरस्कारासाठी निरनिराळ्या विभागातून एकूण ५८ आर्किटेक्टसची निवड करण्यात आली होती.
भारताबरोबरच बांगलादेश,चायना,इंडोनेशिया, इराक,मंगोलीया,फिलीपाईन्स,श्रीलंका,आणि व्हीएतनाम आदी देशातील आर्कीटेक्टस्, प्रतिनिधी या सोहळ्यासाठी उपस्थित होते.
आर्कीटेक्ट बसागरे दाम्पत्य कमर्शियल डिझाईन, बांधकाम व इंटीरिअर क्षेत्रात पुणे,मुंबई, बेंगलोर,चेन्नई, दिल्ली आदी ठिकाणी कार्यरत आहेत.
फोटो- बैंकॉक येथे “गाबा” आंतरराष्ट्रीय पुरस्कार स्विकारताना आर्कीटेक्ट पूजा व आर्कीटेक्ट ऋषिकेश बसागरे