‘अवघा रंग एक झाला’ दिमाखदार सोहळा संपन्न
लातूर :- ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्प शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने विविधअंगी उपक्रम व प्रयोगशीलतेमुळे सर्वांना परिचित आहे. बालभवन ,बालविकास केंद्र व विद्यानिकेतन या वेगवेगळ्या विभागाच्या स्नेहसंमेलनाचे , प्रकल्प प्रदर्शनाचे वेगळेपण अनेक वर्षांपासून जोपासलं आहे.नुकतेच संपन्न झालेले ‘अवघा रंग एक झाला’ स्नेहसंमेलन अतिशय दर्जेदार झाले . अतिशय विविधतेने नटलेले , एकात्मतेकडे घेऊन जाणारे , भावनिकतेला स्पर्श करत हे सादरीकरण प्रेक्षकांच्या हृदयात पोहोचले .
या सोहळ्याचे उदघाटन पालक प्रतिनिधी श्री सौदागर तांदळे ( तहसीलदार,लातूर)श्री.प्रथमेश जाधव ( सिने अभिनेता,मुंबई), श्री.विनायक राठोड (अॅाडीओ ईंजिनिअर ), श्री. मयूर येनगे ( ज्ञानप्रकाश संगीत विद्यालय) संस्थेचे अध्यक्ष श्री. सतीश नरहरे मुख्याध्यापिका ,संचालिका सविता नरहरे यांच्या हस्ते झाले.
यावेळी प्रास्ताविक मुख्याध्यापिका सविता नरहरे यांनी केले.’अवघा रंग एक झाला’ याविषयावर होणाऱ्या स्नेहसंमेलना मागची भूमिका मांडली .

लोकसंगीताच्या बहारदार वादनाने स्नेहसंमेलनाची सुरूवात झाली.मुलांनी ढोलकी पासून ते ढोल पर्यंत अनेक वाद्यांनी प्रेक्षकांना सलामी दिली.ज्ञानप्रकाश संगीत विद्यालयाच्या मुलांचा तबला रंग कार्यक्रम पाहून तर पालक अवाक झाले.वेगवेगळ्या लाईव्ह सादरीकरणात भावभावना,विचार,संस्कृती,प्रदेश,इतिहास डोळ्यासमोर उभे करणारे नृत्य मोठया ताकतीने झाली.शालेय जीवनातील दोस्ती किती निर्मळ आणि जिव्हाळ्याची असते हे सांगणारे नृत्य आल्टीमेट दोस्ती या नृत्याने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला.

इंग्रजी संवाद कौशल्य विकसित व्हावं यासाठी अनेक उपक्रम प्रकल्पात घेतले जातात. ज्यातून मुलांना विचार मांडता यावेत हा उद्देश असतो.परंतु आपल्या भावना तेवढ्याच प्रभावीपणे इंग्रजी नाटकांमधुन पोहचवता येतील का याकरिता My Family is my strength “आपले कुटुंब हीच आपली मोठी शक्ती आहे” या नाटकांमधून संदेश प्रभावीपणे मांडला गेला. हे इंग्रजीतून असणारे हे भावनिक नाटक पाहताना अनेकवेळा उपस्थितांच्या डोळ्यातून पाणी आले.

संपूर्ण कार्यक्रम सलग 4:30 तास चालला. कार्यक्रम संपेपर्यंत सभागृह तेवढेच तुडुंब भरलेले होते. या सर्व सादरीकरणाला पालकांनी उभे राहून दाद दिली.मुलांचे हे सर्व सादरीकरण दर्जेदार करण्यासाठी तांत्रिक विभाग, प्रशिक्षक व सर्व शिक्षकांनी खुप मेहनत घेतली.