जागतिक पाचक आरोग्य दिनानिमित् गुगळे हॉस्पिटलमध्ये आयोजित मोफत तपासणी शिबिरास प्रतिसाद
लातूर , दि. २९ (प्रतिनिधी ) – जागतिक पाचक आरोग्य दिनानिमित्त डॉ. एस .बी .गुगळे मेमोरिअम हॉस्पिटलच्या वतीने मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला. या शिबिरात 213
रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली .
सवलतीच्या दरात गॅस्ट्रोस्कॉपी, रक्त तपासणी ,सोनोग्राफी तपासणी केल्या गेल्या; तसेच या आरोग्य शिबिरात पोटाचे जुनाट विकार, पित्ताशयातील खडे , स्वादपिंडाचे आजार ,ऍसिडिटी, बद्धकोष्ठता, मूळव्याध, वारंवार अपचन ,आय बी एस आय बी डी इत्यादी रोगांची मोफत तपासणी तज्ञ डॉक्टरांच्या वतीने करण्यात आली.

. यावेळी लातूर ग्रामीणचे माजी आमदार वैजनाथ अण्णा शिंदे ,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ। एल. एस .देशमुख ,इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.अनिल राठी व गुगळे हॉस्पिटलचे संचालक डॉ.दीपक गुगळे , डॉ. मेघना गुगळे आदींची प्रमुख उपस्थिती होती .प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते धन्वंतरीचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले .गुगळे हॉस्पिटलच्या वतीने डॉ. दीपक गुगळे , डॉ.मेघना गुगळे यांनी प्रमुख उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .

आपल्या प्रस्ताविकात पोट विकार तज्ञ डॉ. दीपक गुगळे म्हणाले की ,पोट विकारामुळे रोगप्रतिकारक शक्ती, हाडांचे आजार, प्रजनन प्रणाली याबरोबरच मेंदू अन ह्दयाचेही आरोग्य बिघडते . जवळपास 75 टक्के आजार हे, पोटाच्या विकारामुळे निर्माण होतात. पोटाचे निरोगी आरोग्य सांभाळणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे संतुलित आहार आणि पोट विकारापासून दूर राहणे हाच प्रतिबंधात्मक उपाय आहे . माजी आमदार वैजनाथ अण्णा शिंदे ,डॉ.एल. एस देशमुख डॉ. अनिल राठी यांनीही यावेळी आपल्या छोटेखानी भाषणात पोट विकाराबाबत काही टिप्स दिल्या आणि या शिबिराला शुभेच्छा दिल्या. रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली .

सवलतीच्या दरात गॅस्ट्रोस्कॉपी, रक्त तपासणी ,सोनोग्राफी तपासणी केल्या गेल्या; तसेच या आरोग्य शिबिरात पोटाचे जुनाट विकार, पित्ताशयातील खडे , स्वादपिंडाचे आजार ,ऍसिडिटी, बद्धकोष्ठता, मूळव्याध, वारंवार अपचन ,आय बी एस आय बी डी इत्यादी रोगांची तपासणी तज्ञ डॉक्टरांच्या वतीने करण्यात आली.
यावेळी लातूर ग्रामीणचे माजी आमदार वैजनाथ अण्णा शिंदे ,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ। एल. एस .देशमुख ,इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.अनिल राठी व गुगळे हॉस्पिटलचे संचालक डॉ.दीपक गुगळे , डॉ. मेघना गुगळे आदींची प्रमुख उपस्थिती होती .प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते धन्वंतरीचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले .गुगळे हॉस्पिटलच्या वतीने डॉ. दीपक गुगळे , डॉ.मेघना गुगळे यांनी प्रमुख उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .
आभार प्रदर्शन डॉ. मेघना गुगळे यांनी केले. सूत्रसंचालन श्री. विजय यांनी केले.

हे मोफत तपासणी शिबीर यशस्वी करण्यासाठी डॉ. मयूर, डॉ. शुभांगी जाधव, डॉ. स्नेहल, डॉ. प्रवीण, डॉ. प्रीती, डॉ. व्यंकट सर, डॉ. श्रीलेखा, डॉ. स्नेहा, डॉ. जानव्ही गुगळे, श्री. अंश गुगळे, श्री. इम्रान, श्री. कपिल व सर्व कर्मचारी यांनी मोठे योगदान दिले.