19.7 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeराष्ट्रीय*छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती राजधानी दिल्लीत उत्साहात साजरी !*

*छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती राजधानी दिल्लीत उत्साहात साजरी !*


नवी दिल्ली, 15 : छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती रविवारी सायंकाळी महाराष्ट्र सदनात उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रर्माचे आयोजन छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सव समिती २०२३ दिल्ली यांचे वतीने साजरी करण्यात आली. विचारमंचावर लाखोजी जाधवराव यांचे वंशज शिवाजीराव जाधवराव, संस्थापक अध्यक्ष किशोरभाऊ चव्हाण, अध्यक्ष विलासभाऊ पांगारकर, विजय काकडे, विधीज्ञ राज पाटील, बडोदा घराण्याचे राजे शिर्के, प्रदीप साळुंखे मान्यवर उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्रमुख पाहुणे लाखोजी जाधवराव यांचे वंशज शिवाजीराव जाधवराव यांनी इतिहास कालीन अनेक पैलूंचा उलगडा करताना माँ जिजाऊ साहेबांना चार भाऊ असल्याचे नमुद करून जाधवराव कुटुंबातील पहिल्या मुलीच्या जन्मानंतर हत्तीवरुन मिरवणुक काढून साखर वाटणारे आई बाबा ठरले तर माँ जिजाऊ यांच्या दैदिप्यमान कर्तृत्वाचा पाढा वाचताना विदर्भ – मराठवाडा- पश्चिम महाराष्ट्र – कोकण व दक्षिण भारत हे कार्य क्षेत्र कसे होते याबद्दल सांगीतले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलताना अध्यक्ष विलासभाऊ पांगारकर म्हणाले की, आमच्या समितीची वाटचाल प्रगतीच्या दिशेने होत असुन राष्ट्रीय स्तरावर छत्रपती संभाजी महाराज यांचे स्वराज्य निर्मितीचा अखंड तळपणारा दीपक देशभरातील शालेय स्तरावर पोहचावा म्हणून केंद्र शासनातर्फे सुध्दा विशेष उपक्रम राबविला गेला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.


प्राख्यात वक्ते प्रा. प्रदीप साळुंके यांनी अत्यंत मृदु व सरळ भाषेत छत्रपती संभाजी महाराज यांची जीवनी मांडताना छत्रपती संभाजी महाराज यांना नवव्या वर्षीच मिळालेली मनसबदार होते. सोळाव्या वर्षी लिहलेले महत्वपुर्ण ग्रंथ आणि त्यातुन मांडलेली स्वराज्याची संकल्पना अत्यंत महत्त्वाची असून त्या मधुन प्राप्त संदेशच खरी एकात्मतेची हाक देणार असुन अठरा पगड जातींच्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य रक्षणार्थ आपले आयुष्य वेचले. म्हणी वाक्यप्रचारातून त्यांनी आजच्या परिस्थितीवरही बोट ठेवले. छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात कधी हार मानली नाही तोच संदेश त्यांच्या मावळ्यांनी घ्यावा असे त्यांनी यावेळी आवाहन केले.
विजय काकडे, मराठा रामनारायण, कमलेश पाटील, मराठा, इंजि.तानाजी हुस्सेकर, विधीज्ञ राज पाटील, बडोदा घराण्याचे राजे शिर्के यांची ही प्रबोधनपर भाषणे झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी समितीच्या पाठपुराव्यामुळे शासनातर्फे साजरे करण्यात येणारे राष्ट्रीय पुरुषांच्या जयंती कार्यक्रमाच्या यादीमध्ये १४ मे हा दिवस छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती म्हणून समाविष्ठ केल्यामुळे राज्य शासनाचे आभार व्यक्त केले. त्यांनी यावेळी राष्ट्रीय स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्याची मागणी केली. यासह मराठा टुरिझम नावाने शिवरायांचा भौगोलिक इतिहास जोडणारा प्रकल्प केन्द्र शासनाने हाती घ्यावा, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.
या संपुर्ण कार्यक्रमांचे खुमासदार पद्धतीने सुत्र संचालन समिती कार्याध्यक्ष राजेंद्र दाते पाटील यांनी करून चपखल शब्दांचा वापर करत कार्यक्रमाची रंगत वाढविली. आभार समितीचे उपाध्यक्ष प्रा.डॉ.राजाराम दमगीर यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला. या कार्यक्रमास महाराष्ट्रातून तसेच दिल्लीतून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना मानणारे मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्र सदन येथे असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करण्यात आली यासह या परिसरात असणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सदनाच्या आतील भागात असणाऱ्या छत्रपती शाहू महाराज अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले अर्धाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]