भाजपा कार्यकर्ते चंद्रकांत कातळे यांची
मध्य रेल्वेच्या क्षेत्रीय समितीवर निवड
लातूर दि.९ – लातूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रेणापूर येथील सक्रिय कार्यकर्ते चंद्रकांत कातळे यांची मध्य रेल्वेच्या क्षेत्रीय सल्लागार समिती अर्थात झेडआरयुसीसी या उच्चस्तरीय समितीवर निवड झाली आहे.
मध्य रेल्वे हा भारतीय रेल्वेतील एक महत्त्वाचा विभाग आहे. मध्य रेल्वेच्या महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ, नागपूर या उपविभागासह ईशान्य कर्नाटकातील काही व दक्षिण मध्य प्रदेशमधील काही रेल्वेमार्ग मध्य रेल्वेच्या अखत्यारीत येतात. रेल्वे स्थानकावर विविध सुविधा उपलब्ध करून देणे, समितीच्या कार्यक्षेत्रात नवीन रेल्वे स्थानकाचा प्रस्ताव सादर करणे, रेल्वेच्या वेळापत्रकासंबंधी व्यवस्था, रेल्वे द्वारा प्रवाशांच्या विविध सुविधांमध्ये सुधारणा करणे आदी कामे समितीच्या माध्यमातून केली जातात.
रेल्वे मंत्रालय अंतर्गत असलेल्या झेडआरयुसीसी या उच्चस्तरीय समितीवर भाजपाचे चंद्रकांत कातळे यांची निवड झाली आहे या निवडीबद्दल त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.
मध्य रेल्वेच्या उच्चस्तरीय समितीवर काम करण्याची संधी दिल्याबद्दल केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीशजी महाजन, माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, खा. सुधाकर शृंगारे, आ. रमेशआप्पा कराड, आ. अभिमन्यू पवार भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यांच्यासह भाजपाच्या सर्व मान्यवर नेत्यांचे चंद्रकांत कातळे यांनी आभार व्यक्त केले आहेत.