16.6 C
Pune
Tuesday, December 24, 2024
Homeलेख*गणेश संग्रहक अनिल देशपांडे*

*गणेश संग्रहक अनिल देशपांडे*

वाचकांची सकाळ मंगलमय व्हावी या हेतुने महाराष्र्ट टाईम्सच्या मखरात रोज एका गणेशमूर्तीला स्थान दिले जाऊ लागले. ११फेबुवारी २००३ ला या उपक्रमाला सुरवात झाली.पण जगण्याचा विलक्षण पसार्‍यातला काही सेकंदाचा हा मामला असला तरी तो एखाद्याच्या आयुष्यात समाधानाचा ठेवा ठरु शकतो हे नाशिकमधल्या अनिल गोविंद देशपांडे यांनी दाखवुन दिले.

मटाच्या मखरातले अगदी पहिल्या दिवसापासून ते कालपर्यतचे गणपती छायाचित्र, नावासह त्यांच्या वहीत विराजमान आहे.

या मुळखावेगळ्या छंदाची सुरुवात कशी झाली,हे सांगताना श्री देशपांडे म्हणाले,
म. टा.मध्ये
दररोज एक गणपती छापून येणार हे वाचल्यावर माझी मुलगी अनुजा म्हणाली, आपण या गणपतींचा संग्रह करु यात का ? आणि मलाही ती कल्पना आवडली.

देशपांडे मुंबईतच लहानाचे मोठे झालेले आणि १९८९ पर्यत तिथेच महाराष्र्ट बँकेत नोकरीस होते .१९९३ साली ते नाशिकला स्थायिक झालेत.घरात पूर्वीपासूनच मटायेत असल्याने कळायल्या लागल्यापासूनच ते त्याचे वाचक बनले.गेल्या कित्तेक वर्षापासून त्यांच्या जगण्यात मटा सामावून गेला आहे.

प्रारंभी महिन्याभराचे मटाचे अंक सांभाळून ठेवले.आणि एक दिवस बैठक मारून त्यातून गणपतीचे फोटो आणि पानाच्या एका कोपर्‍यात येणारी त्याची माहिती अशी कात्रणे काढली.एक वही घेऊन त्यात ती चिकटवली.

पुढे पेपर हातात घेतल्या बरोबर रोजचा गणपती पाहण्याचा शिरस्ताच होऊन गेला.अंक जुना झाल्यावर त्याच्या पहिल्या पानाला कुणी हात लावायचा नाही, अशी सक्त ताकीद घरात देऊन ठेवली. वेळ मिळेल तशी तशी कात्रणे ते काढतात आणि जमेल तेव्हां ती चिकटवतात.आजवर अशा नऊ वह्या पूर्ण झाल्या आहे.व आता दहावी वही चालु आहे.आत्ता पर्यत सहा हजार नऊशे गणपतीची कात्रणे वहीत चिकटवली आहेत.

साधारणपणे रोजच वेगवेगळे गणपती छापून येतात.यातले काही गणपती अगदी लक्षात राहणारे आहेत.जसे ठाण्याच्या नौपाडातील २१ मुखी गणपती,काही अती पुरातन ,काही परदेशातले गणपती असे.

१९९६ साली स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर हाती असलेल्या मोकळ्या वेळात काहीतरी आगळं करण्याच समाधान देणार हे काम आहे,अशी देशपांडे यांची भावना आहे.

देशपांडे यांच्या या उपक्रमाची दखल घेऊन
`मटा कार्यालयात
गणेशाची मूर्ती भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी त्यांचे कुटुंबीय आवर्जुन उपस्थित होते.
कुणा गणेश भक्ताला हे सर्व गणेश पहायचे असतील तर आम्ही त्यांचे स्वागतच करतो,असे सौ अंजली अनिल देशपांडे यांनी
आवर्जून सांगितले.


लेखन: देवेंद्र भुजबळ
☎️9869484800

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]