28.3 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeसहकार*केंद्र शासनाच्या शेतीवीषयक धोरणामुळे शेतकऱ्यांना मोठा लाभ -केंद्रिय राज्य मंञी दानवे*

*केंद्र शासनाच्या शेतीवीषयक धोरणामुळे शेतकऱ्यांना मोठा लाभ -केंद्रिय राज्य मंञी दानवे*


इथेनाॕल सीएनजी व शेंद्रीय खत निर्मिती कारखान्याचे केंद्रीय मंञी दानवे यांच्या हस्ते भूमीपुजन 
निलंगा/प्रतिनिधी 

 सध्याच्या सरकारची धोरण हे शेतीसाठी गुंतवणुकीचे असल्यामुळे शेतकऱ्यांना शेती परवडणारी ठरेल असे प्रतिपादन रेल्वे, कोळसा खाण केंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले ते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना लीज ओंकार सहकारी साखर कारखाना येथे तीन मोठ्या प्रकल्पाचे भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी ते बोलत होते. 


 यावेळी मंचावर लातूर जिल्ह्याचे खा. सुधाकर शृंगारे, माजी मंत्री तथा आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, माजी आमदार गोविंद केंद्रे, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, माजी आमदार टी पी कांबळे, माजी आमदार पाशा पटेल, भाजपा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, गणेश दादा हाके,अॕड संभाजीराव पाटील शिरूरअंतपाळकर,गुरूनाथ मग्गे,माजी.जि.प.अध्यक्ष मिलिंद लातूरे,किरण उटगे,उपविभागीय अधिकारी शोभा जाधव,तहसिलदार घनश्याम अडसूळ,कारखाना चेअरमन बाबुराव बोञे पाटील अदि मान्यवर होते.


पुढे बोलताना मंञी महोदय म्हणाले की गेल्या बारा वर्षापासून डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना बंद होता.माञ परीसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अडचण दूर व्हावी या हेतूने ओंकार शुगर मिलला कारखाना देऊन शेतकऱ्यांची अडचण दूर केली असे सांगत केंद्र शासनाच्या धोरणामुळे आता पिक विम्याची रक्कम मोठ्या प्रमाणात मिळत आहे.एक रूपया विमा शेतकऱ्यांनी भरायचा व उर्वरीत रक्कम राज्य शासनाने भरायची हे फक्त भाजप सरकारच्या काळात होऊ शकते असे सांगत ५० हजार रूपयावरून शेततळ्याची रक्कम आता ७५ हजार रूपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.या योजनेचा शेतकऱ्यानी लाभ घ्यावा अशा सुचना केल्या.मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी आता जागृत होण्याची गरज आहे.यासाठी शेतकरी मेळावे घ्यावे फार्मर प्रोडूसर कंपन्याची स्थापना करावी सरकार आपल्या पाठीशी आहे.२०१४ पासून मोदि सरकारमुळे पिकविमा संरक्षण मिळत आहे.असे सांगत आज भूमीपुजन झालेल्या तिन्हीही कारखान्यातून निर्मितीतून मिळणाऱ्या फायद्यामुळे शेतकऱ्यांना सर्वाधिक भाव हा कारखाना देईल असे अश्वासन दिले.तर लवकरच लातूर ते गुलबर्गा पिटलाईन मंजूर करण्यात येईल असे त्यानी माहिती दिली…..

यावेळी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले आज झालेल्या भूमिपूजनाच्या कारखान्याचा शुभारंभ पुढच्या वर्षी होईल यावेळी सोलार विज निर्मिती,हायटेक नर्सरी,ऊस उत्पादक कुटुंब प्रमुखाचा विमा,ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मुलासाठी व्यवसाय व शैक्षणिक मार्गदर्शन शिबीर व एक स्वतंत्र बँकेची निर्मिती करणार असल्याचे सांगितले.डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यानी मोठ्या कष्टाने साखर कारखान्याची उभारणी केली होती.माञ तत्कालीन चेअरमन अशोकराव पाटील निलंगेकर व संचालक मंडळ यांच्या चुकीच्या धोरणामुळे कारखाना १२ वर्षे बंद राहिला माञ गतवर्षीच्या ऊत उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन ओंकार शुगर मार्फत हा कारखाना चालू झाल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांची अडचण दूर झाली आहे.त्यामुळे लातूर जिल्ह्यातील कारखानदारांची मक्तेदारी संपुष्टात येणार आहे.असे सांगून केवळ विरोधकानी जॕकेट व टोपीवर राजकारण न करता विकासाचे राजकारण करावे असा सल्ला आपले काका अशोकराव पाटील निलंगेकर याना दिला.


कोणी कितीही भाव देवो आमचा भाव सर्वाधिक राहिल….चेअरमन बाबुराव बोञे 
यावर्षी कारखाना चालू करण्यासाठी कमी वेळ मिळाला तरीही १ लाख ४ हजार मेट्रीक टन गाळप केले.पंचविशे रूपयाचा सर्वाधिक भाव ऊस उत्पादकाना देण्यात आला असे सांगून पट्टा पध्दतीने ८६०३२ या ऊस जातीची लावन करावी यामुळे शेतकऱ्यांना व कारखानदाराला सोपे जाईल व याचा फायदा जास्तीतजास्त शेतकऱ्यांना होईल कोणी कितीही भाव देवो आमच्या कारखान्याचा भाव सर्वाधिक राहिल म्हणताच ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करून चेअरमनचे स्वागत केले.
या कार्यक्रमाचे सुञसंचलन संजय दोरवे तर आभार शेषराव ममाळे यानी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]