कुमार साहित्य संमेलनातून भाषा समृध्दीचे केंद्र- पद्मभूषण डॉ अशोकराव कुकडे
लातूर ( वृत्तसेवा) –हरंगुळ ( बु)जनकल्याण निवासी विद्यालय व ज्ञान प्रबोधिनी -छात्र प्रबोधन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कुमार साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी श्री पद्मभूषण डॉ अशोकराव कुकडे (काका) बोलताना म्हणाले की, कुमार साहित्यिकांसाठी छात्र प्रबोधन व जनकल्याण निवासी विद्यालयाने तुमच्यासाठी स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केले आहे. सामाजिक व कौटुंबिक लेखनातून दिपस्तंभ निर्माण केले पाहिजेत. अशा साहित्य संमेलनातून उद्याचे सृजनशील लेखक/कवी निर्मिती च्या कामाची चळवळीतून भाषा समृध्दीचे केंद्र होतील .
लातूर व परिसरातील २९ शाळेतील ५३७ विद्यार्थी , ६० शिक्षकांच्या उत्स्फूर्त सहभागातून मराठवाड्यातील पहिले कुमार साहित्य संमेलन जनकल्याण निवासी विद्यालय हरंगुळ बु येथे संपन्न झाले.

या संमेलनाचे उद्घाटन पद्मभूषण डॉ. अशोकराव कुकडे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रकल्प अध्यक्ष श्री. प्रकाशजी लातुरे, छात्र प्रबोधन मासिकाचे संपादक श्री.महेंद्रभाई सेठीया , डॉ .लीलाताई कर्वा, शिल्पाताई कुलकर्णी उपस्थित होते. तर समारोप प्रसंगी शिवशाहीर श्री .संतोषजी सांळूके, श्री . महेंद्रभाई सेठीया , संमेलन प्रमुख श्री.उमेशजी सेलूकर , सौ. शिल्पाताई कुलकर्णी उपस्थित होते.
दिवसभरातील कार्यक्रमामध्ये हैद्राबाद मुक्तीसंग्रामावर आधारित पोवाड्याचे सादरीकरण जनकल्याण विद्यालयातील शिक्षक शंकरराव देशमुख व समूहाने केले.

विद्यार्थ्यांसाठी कविता,कथा , प्रवासवर्णन, व्यक्तीचित्रण, नाट्यछटा, पुस्तक रसास्वाद, संवाद लेखन, अनुभवपर , माहितीपर या विविध विषयावर आधारित लेखन कार्यशाळा व लेखक गप्पा तसेच कुमार साहित्यिकांनी स्वरचित साहित्य सादरीकरण केले .
उद्घाटनाच्या कार्यक्रमात छात्र प्रबोधन द्वारा अंकातील साहित्यातून प्रकाशित झालेल्या *ध्यासपंथावरील दीपस्तंभ* या एक्काहत्तराव्या पुस्तकाचे प्रकाशन झाले.
यासाठी प्रसिद्ध साहित्यिक श्री.रेणू पाचपोर , श्री .मुकुंदराज कुलकर्णी, श्रीमती.संगिताताई बर्वे, मृणालिनी कानिटकर – जोशी, क्षितिज देसाई, स्वाती ताडफळे, केलास दौंड, बालाजी इंगळे,शंतनू पांडे या प्रसिद्ध साहित्यिकांनी लेखन कौशल्याच्या कार्यशाळेतून मार्गदर्शन केले.

यामध्ये पुस्तक प्रदर्शन, विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या साहित्याची भिंत तसेच अभ्यासक्रमातील ‘लाखांच्या गोष्टी’ नाटिकेचे सादरीकरण झाले. तसेच साहित्यिक,संत यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी मराठी स्वाक्षरी साठी अभियान केले. विद्यार्थ्यांसाठी कल्पक स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये २३५ विद्यार्थ्यांनी पारितोषिक प्राप्त केले. तसेच सहभागी सर्वांना छात्र प्रबोधन प्रकाशित पुस्तक भेट देण्यात आले. कुमार साहित्यिकांना अल्पोपहार व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रदीप मुसांडे, श्री . हरिदास बाबळसुरे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री प्रकाशजी लातूरे यांनी केले.

संमेलन यशस्वी करण्यासाठी जनकल्याण निवासी विद्यालयाचे प्रकल्प कार्यवाह राजेश सुगरे, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सोनटक्के, प्रशासकीय अधिकारी श्री रवींद पुर्णपात्रे, अधीक्षक श्री दत्ता माने, शिक्षक -पर्यवेक्षक यांनी परिश्रम घेतले.