कर्मयोगी स्व.डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर कारखान्याचे बाॕयलर अग्निप्रदीपन…
निलंगा ; दि.21 ( वृत्तसेवा )–मागील काळात जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखानदारानी अडचणीत आणले होते ऊसाला फडला गाड्या लागत नव्हत्या कारखानदारांचे उंबरे शेतकऱ्यांना झिजवावे लागत होते.गेल्याच वर्षी अंबुलगा कारखाना चालू झाल्यानंतर कारखानदारानाच शेतकऱ्यांच्या दारात जावे लागले त्याच बरोबर वाढीव भाव सुध्दा द्यावा लागला या कारखान्यामुळे अप्रत्यक्षरित्या जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फायदा झाला आहे.त्यामुळे या कारखान्याला आई सारखे प्रेम द्या कारखाना आपल्या हक्काचा आहे.यशस्वी चालवण्यासाठी साथ द्या अशी भावनिक साद माजी मंञी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यानी अंबुलगा कारखाना बाॕयलर अग्निप्रदीपन वेळी घातली आहे.

यावेळी कार्यक्रम अध्यक्षस्थानी माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर,चेअरमन बाबुराव बोञे पाटील,सौ.रेखाताई बोञे पाटील,बाजार समिती सभापती राजकुमार चिंचनसुरे,नरसिंग बिराजदार,उपसभापती लाला देशमुख,सुनिल माने,शिवानंद हैबतपुरे,भाजपा तालुकाध्यक्ष कुमोद लोभे,मंगेश पाटील,काशिनाथ गरीबे,संजय दोरवे,दगडू सोळुंके,मिलिंद लातूरे,बाळासाहेब शिंगाडे,प्रगतशिल शेतकरी गोविंद बिरादार,सुग्रीव पाटील,आदि व्यासपिठावर उपस्थित होते.
पुढे बोलताना निलंगेकर म्हणाले मरावाड्यात व जिल्ह्यात अनेक कारखाने माफक दरात साखर देणारे कारखाने आहेत.परंतु ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोफत साखर वाटप करणारा कर्मयोगी डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर कारखाना पहिला कारखाना आहे.कारखान्याची पहिली साखर देवाला अर्पण केली जाते,त्याच प्रमाणे कारखान्याचा खरा देव हा ऊस उत्पादक शेतकरी आहे.म्हणून आम्ही शेतकऱ्यांना मोफत साखर वाटप केली आहे.एखाद्या गोष्टी बद्दल आपली भावना प्रामाणिक योग्य असेल तर निसर्ग तुमच्या पाठीशी असतो,त्यामुळेच शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा निर्णय घेतला आहे.असे बोलून पुढे म्हणाले दुष्काळी परिस्थितीत ऊसाचे बिल अनेक बँका कर्जात कपात करून घेतल्याने शेतकऱ्यांना अडचणी येतात,त्यामुळे आम्ही कारखाना बँकेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे खाते काढून ऊसाचे बिल तात्काळ त्या खात्यावर जमा करून आदा करू असे आ.निलंगेकर यानी सांगितले.

चेअरमन आणि कारखाना प्रशासन कारखाना त्यांच्या पध्दतीने चालवत आहेत.कारखान्यात कसलच राजकारण आणणार नाही.राजकारण कारखान्याच्या बाहेर ठेवून हा कारखाना शेतकऱ्यांचा राहिला पाहिजे याला आपण मंदिरापेक्षा जास्त महत्त्व देतो.हा कारखाना कर्मयोगी डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यानी आपल्या सुक्ष्म नियोजनातून उभा केला असून त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून हा कारखाना चांगला चालवून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवणात आर्थिक उत्क्रांती आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू डिस्लरी सीएनजी,खत निर्मिती असे सहउद्योग उभा करून चांगला भाव देऊ.रक्त आटवून ऊभा केलेल्या डॉ.निलंगेकर याना सुध्दा आज आनंद होत असेल असे भावनिक उद्गार शेवटी आ.निलंगेकर यानी काढले.कार्यक्रमाचे सुञसंचलन व आभार भाजपाचे जिल्हाउपाध्यक्ष शेषराव ममाळे यानी केले.

जिल्ह्यात काही कारखाने मापत पाप करतात वजन काट्यात मोठा घोळ करून शेतकऱ्यांना अक्षरशः लुटले जाते असे म्हणताच अनेक शेतकऱ्यांनी उठून आमदार साहेब तुमचे खरे आहे .म्हणत योग्य आहे असे म्हणाले.त्यावर आमदार निलंगेकर म्हणाले मापात पाप कधीच आम्ही करणार नाही असे अभिवचन उपस्थित शेतकऱ्यांना त्यानी दिले.

रुपाताई पाटील यांचे आवाहन
जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे.त्यामुळे शेती बरोबर पिण्याचा पाण्याचा प्रश्न भविष्यात उदभवणार आहे.त्यामुळे उपलब्ध पाणी साठ्यावर सूक्ष्म सिंचन पध्दती राबवून शेतकऱ्यांनी ऊस व इतर पिक शेती टीबक सिंचनावर करावी त्याच बरोबर सेंद्रिय शेतीवर भर असावा रासायनिक खत व किटक नाशकाचा वापर कमी करावा अशा सुचना देऊन डिसलरी सारखे प्रकल्प आपल्या भागात उभा राहत आहेत याची कल्पना देखील कधी केली नव्हती परंतु चेअरमन बोञे पाटील यानी तीन युनिट उभा करत आहेत.त्यासाठी कुठली अडचण आली तर मी स्वता सोबत येऊन अडचण दूर करेन असे अश्वासन माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर यानी दिले.

जिल्ह्यात उच्चांकी भाव आणि मराठवाड्यात सर्वाधिक गाळप करू…चेअरमन बाबुराव बोञे पाटील
साखर कारखानदारी व्यवसाय हा शेतकऱ्यांच्या जीवावर चालतो आक्काच्या आगृहखातर आम्ही शेतकऱ्यांना मोफत साखर वाटप करत आहोत.यापुढे आम्ही डिसलरी,सीएनजी खत निर्मिती प्रकल्प आगामी काळात चालू करत आहोत.यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जिल्ह्यात सर्वाधिक भाव आम्ही देऊ शकतो याची मला खाञी आहे,त्याच बरोबर मराठवाड्यात सर्वाधिक गाळप करण्याचा विक्रमही भविष्यात आमचाच राहिल असा आत्मविश्वास त्यानी उपस्थित शेतकऱ्यांना प्रास्तविकपर भाषणात बोलून दाखविले.