इचलकरंजी दि. ६ जानेवारी- येथील अ.भा. मराठी नाट्य परिषद इचलकरंजी शाखा आणि इचलकरंजी महानगरपालिका यांच्या वतीने मराठी भाषा संवर्धन उपक्रमाच्या अंतर्गत ‘राज्यस्तरीय मराठी बालनाट्य स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. दिनांक ९ आणि १० जानेवारी २०२३ या कालावधीत रोज दुपारी १२ ते रात्री ९ वाजेपर्यंत येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहामध्ये बालनाट्यांचे सादरीकरण होणार आहे. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून या स्पर्धेत १८ संघ सहभागी झाले आहेत.
सोमवार दिनांक ९ जानेवारी रोजी १२ वाजता स्पर्धेचे उदघाटन होईल. त्यानंतर लागलीच आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज पेठवडगाव – हरीत उर्जेच्या दिशेने, अण्णाभाऊ इंग्लिश स्कूल आजरा – रानफूल, सनी कला मंच औरंगाबाद – कस्तुरी, पंडित दीनदयाळ हायस्कूल आजरा – गाणारा मुलुख, नवनाट्य मंडळ आजरा – हॅलो मिनी बोलते, रोझरी हायस्कूल आजरा – सावधान कोर्ट चालू आहे, रुद्रांश अकॅडमी कोल्हापूर – हेच का ते बालपण देवा, गडहिंग्लज कला अकादमी गडहिग्लज – राखेतून उडाला मोर आणि गडहिंग्लज नगर परिषद गडहिंग्लज – झाडवाली झुंबी ही बालनाट्ये सादर होणार आहेत.
समारोपाच्या दिवशी मंगळवार दिनांक १० जानेवारी रोजी दि न्यू हायस्कूल इचलकरंजी – हेल्मेट, रामकृष्ण मालू प्राथमिक विद्यामंदिर जयसिंगपूर – दुष्काळ, चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर फाउंडेशन कोल्हापूर – या चिमण्यांनो परत फिरा रे, श्री बालाजी माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज इचलकरंजी – थेंब थेंब श्वास, आजरा हायस्कूल आजरा – वारी, शिंदे अकॅडमी कोल्हापूर – गणपती बाप्पा हाजीर हो, प्रज्ञान कला अकॅडमी वारणा – पवित्र थेंब, अलंकार कला अकादमी कोल्हापूर – दगड आणि रंगमित्र रायगड – जिर्णोद्धार ही बालनाट्ये सादर होणार आहेत. याच दिवशी स्पर्धा संपल्यानंतर बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.
सदरच्या स्पर्धेसाठी पुणे व सांगली येथील मान्यवर रंगकर्मी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत. सदरची स्पर्धा पाहण्यासाठी सर्वांना प्रवेश खुला असून विद्यार्थी आणि रसिक नागरिकांनी बालनाट्यांचा आस्वाद घेण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी जरूर यावे असे आवाहन महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख आणि नाट्य परिषद शाखेचे अध्यक्ष डॉक्टर एस पी मर्दा यांनी केले आहे.