16.6 C
Pune
Tuesday, December 24, 2024
Homeठळक बातम्या*इचलकरंजीत प्रभात फेरी काढून अमृत महोत्सवी स्वातंत्र्य महोत्सवाला प्रारंभ*

*इचलकरंजीत प्रभात फेरी काढून अमृत महोत्सवी स्वातंत्र्य महोत्सवाला प्रारंभ*

पालकांचे पारंपरिक वेशभूषेत लेझीम खेळाचे बहारदार प्रदर्शन

इचलकरंजी / ( प्रतिनिधी) ––इचलकरंजी महापालिका संचालित रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतनच्या वतीने अमृत महोत्सवी स्वातंत्र्य महोत्सवाला आज मंगळवारपासून मोठ्या
उत्साहाने प्रारंभ झाला.५०० हून अधिक पालकांनी पारंपरिक वेशभूषेत टागोर विद्यानिकेतनपासून ते महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत प्रभात फेरी काढली.प्रभात फेरीमध्ये पालकांनी लेझीम खेळाचे बहारदार प्रदर्शन केले. तसेच सहभागी पालकांनी भारतीय स्वातंत्र्य सेनानींच्या प्रतिमा हातात धरून मिरवणुकीमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.यानिमित्ताने देशवासियांनी हर घर तिरंगा या उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचा संदेश मिळाला.तसेच या प्रभात फेरीमुळे संपूर्ण शहर राष्ट्रभक्तीने न्हाऊन निघाले.

केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार इचलकरंजी महापालिका प्रशासनानेअमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज लावण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.या उपक्रमाच्या जनजागृतीच्या उद्देशाने इचलकरंजी महापालिका संचालित रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतनच्या वतीने अमृत महोत्सवी स्वातंत्र्य महोत्सवाला आज मंगळवारपासून मोठ्या
उत्साहाने प्रारंभ झाला.यावेळी ५०० हून अधिक पालकांनी पारंपरिक वेशभूषेत टागोर विद्यानिकेतनपासून ते महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत प्रभात फेरी काढली.प्रभात फेरीमध्ये पालकांनी लेझीम खेळाचे बहारदार प्रदर्शन केले. तसेच सहभागी पालकांनी भारतीय स्वातंत्र्य सेनानींच्या प्रतिमा हातात धरून मिरवणुकीमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
तसेच या प्रभात फेरीमुळे संपूर्ण शहर राष्ट्रभक्तीने न्हाऊन निघाले.यावेळी
शहरातील नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करून राष्ट्रभक्तीपर घोषणा देवून भारतीय तिरंगा ध्वजाला सलाम करून प्रभात फेरीला उत्स्फूर्त दाद दिली.अखेर महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन करुन या फेरीची सांगता करण्यात आली.
यावेळी महापालिकेचे उपायुक्त डॉ.प्रदीप ठेंगल,कामगार अधिकारी विजय राजापुरे,शहर अभियंता संजय बागडे,जनसंपर्क अधिकारी नितीन बानगे,अतिक्रमण निर्मुलन विभागाचे सुभाष आवळे,शाळा व्यवस्थापनच्या अध्यक्ष अर्चना रावळ,माजी नगरसेविका सुनीता मोरबाळे ,मुख्याध्यापिका अलका शेलार- खोचरे ,पालक व सर्व शिक्षक उपस्थित होते.दरम्यान ,
उद्या बुधवारपासून शालेय स्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत सर्व पालकांनी आपल्या कुटुंबासमवेत ध्वजारोहण करण्यासाठी शाळा व्यवस्थापनाकडून विशेष प्रयत्न सुरु आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]