सेवेतून डीसमिस केल्याने आर्थिक विवंचना व ताणतणावामुळे एस.टी.कर्मचा-याचा -हदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
निलंगा आगारातील दुर्दैवी घटना
निलंगा/प्रतिनिधी
मागील चार महिन्यापासून एस.टी.महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाकडे यांच्या विविध मागण्या व विलणीकरण यासाठी बेमुदत संप पुकारला आहे. मा अजूनही काही कर्मचारी कामावर रूजू न होता त्यांच्या मागणीवर ठाम आहेत.त्यामध्येच निलंगा आगारातील कामावर रूजू न झालेल्या सतीश मधूकरराव चपटे वय ४० या निलंगा आगारातील यांञिकी कर्मचा-यालाही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ लातूर विभाग यांच्याकडून एकतर्फी चौकशीअंती ८ जानेवारी रोजी बडतर्फ (डिसमिस) केले होते त्यामुळे बडतर्फ कर्मचाऱ्यांना मागील चार महिण्यापासून कोणताही पगार नव्हता म्हणून निर्माण झालेल्या आर्थिक विवंचना व ताणतणावामुळे त्यांचा शनिवारी दिनांक १९ रोजी -हदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झा असून त्यांच्या पश्चात आई वडील भाऊ पत्नी दोन मुले असा परिवार आहे.
निलंगा आगारातील अशा एकून ६८ कर्मचाऱ्यांवर बडतर्फची कारवाई करण्यात आली असल्याने बहूतांश कर्मचारी हे सध्या तणावग्रस्त जीवन जगत असून त्यांच्या कुटुंबियावर उपासमारीची वेळ आली आहे.असे किती बळी जाण्याची वाट हे राज्य शासन बघणार आहे असा संतप्त सवाल नातेवाईकाकडून उपस्थित केला जात आहे.