पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते
आयएमए लातूरच्या आरोग्य जनसंवाद परिसंवादाचे उद्घाटन
लातूर प्रतिनिधी : रवीवार दि. १ मे २०२२ :
लातूर आयएमए च्या वतीने आयोजित, “हेडइंज्युरी: गांभीर्य, उपचार व प्रतिबंध” या विषयावरील जनसंवाद उपक्रमाचा राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी शुभारंभ केला तसेच या संकल्पनेची माहिती घेतली.

राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते रविवार दि. १ मे रोजी लातूर शहरातील दयानंद सभागृह येथे लातूर आयएमए व दयानंद विधी महाविद्यालय लातूर यांच्या वतीने आयोजित केलेल्या आरोग्य जनसंवाद पुष्प पहिलेचे उद्घाटन करण्यात आले, पालकमंत्री ना. देशमुख यांनी भेट देऊन हेड इंजुरी गांभीर्य उपचार व प्रतिबंध याची माहिती जाणून घेतली. समाजोपयोगी उपक्रम राबवत असल्याबद्दल आयएमए लातूर शाखेचे अभिनंदन केले. लातूरकरांना अद्ययावत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या कामी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही पालकमंत्री ना. देशमुख यांनी याप्रसंगी दिली.

यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे, लातूर आयएमएचे अध्यक्ष कल्याण बरमदे, सचिव मुकुंद भिसे, डॉ. सुधिर फत्तेपुरकर, डॉ. हणमंत कीनिकर, दयानंद विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुनम नाथानी, डॉ.अजय जाधव, राजकुमार जाधव, अभिजित देशमुख, सोनू डागवाले, डॉ. अशोक पोद्दार, डॉ. अभय कदम, डॉ. अरविंद भातांब्रे, ॲड. आशिष बाजपेयी, जिल्हा शल्यचिकित्सक लक्ष्मण देशमुख, श्रीकांत उटगे, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर देशमुख, डॉ. रमेश भराटे, डॉ. पद्मावती बियाणी, दयानंदचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, प्राचार्य कीर्ती सातपुते, प्राचार्य गुमरेला आदीसह लातूर आयएमए चे पदाधिकारी सदस्य विद्यार्थी रुग्ण नातेवाईक नागरिक उपस्थित होते.

———-