आमदार अभिमन्यू पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लेख

2
1046

*अभिमन्यू  ‘ चक्रव्यूह ‘ भेदणार का ….?

  • महाभारत काळात अभिमन्यू ची व्यक्तिरेखा खूपच गाजली. कमी वयात असताना ही अभिमन्यूने असामान्य कामगिरी केली होती. त्यामुळे एकविसावे शतक उगवले तरी, अभिमन्यू आणि चक्रव्यूह याबाबत नेहमीच चर्चा होते आणि त्याचे संदर्भ अनेक राजकारणी आपल्या भाषणात देतात. पत्रपंडित आपल्या लिखाणातून अभिमन्युच्या चक्रव्यूह भेदण्याचे संदर्भ देत असतात. महाभारतात कौरव आणि पांडव यांच्यात युद्ध चालले होते. युद्धाच्या तेराव्या दिवशी गुरु द्रोणांनी आपल्या सैन्याची रचना चक्रव्यूहात केली. ठरल्याप्रमाणे त्रिगर्त बंधूंनी केली. अर्जुनाला आव्हान देऊन दक्षिण दिशेला युद्धात गुंतवून ठेवले. चक्राच्या मध्यावर दुर्योधन होता आणि त्या पद्म चक्राच्या अनेक पाकळ्या, अनेक वीरयोध्दे होते. राधेय, दुःशासन, कृत आणि काही वीर दुर्योधनाच्या लगतच्या चक्रावर होते. त्यानंतर चक्रव्यूहात चक्रात जयद्रथ, अश्वत्थामा नंतर शकुनी, कृतवर्मा, शल्य, भुरीश्रव आणि शाल्य उभे होते. सर्वात बाहेरच्या बाजूला द्रोण स्वतः होते. पांडवाकडून भिम नेतृत्व करत होता. सार्थकी, दृष्टधूम आणि अनेक वीर त्याच्या मदतीला होते. त्यांनी हल्ला केला खरा पण द्रोनांणी परतवून लावला. खूप वेळ युद्ध चालू होते पण पांडव चक्रव्यूहाचा भेद करू शकले नाहीत. युधिष्ठिर अस्वस्थ झाला. त्याला काही सूचना अर्जुन या चक्रव्यूहाचा भेद, शकला असता पण तो तर त्रिगर्ताबरोबर गुंतला होता. आता सुभद्रा पुत्र अभिमन्यु हा एकमेव आधार होता. कारण त्यालाच चक्रव्यूहाचा भेद कसा करतात हे ठाऊक होते. हे ठाऊक होते आणि ही गोपट युधिष्ठिराला ही माहिती होती. युधिष्ठिराला दुसरा मार्ग सुचेना कारण अर्जुन केंव्हा परत येईल, याची शाश्वती नव्हती. सुषमाने तर अर्जुनाला युद्धात चांगलेच गुंतवून ठेवले होते. नाइलाजाने युधिष्ठिर येऊन म्हणाला, अभिमन्यू, या चक्रव्यूहाचा भेद जर वेळीच केला नाही तर आपल्या सैन्याचा विनाश अटळ आहे, आणि तसे जर झाले तर अर्जुनाला ते अजिबात आवडणार नाही. तो मला दोष देईल. चक्रव्यूहाचा भेद कसा करतात हे फक्त श्रीकृष्ण, कृष्णपुत्र प्रदुम, आणि अर्जुन तुलाच ठाऊक आहे. त्यामधील आता या क्षणी तूच आता आम्हाला मदत कर, असे मी विनवितो. या अवघड प्रसंगी तू आमचा एकमेव आधार आहेस तू पुढाकार घे आणि या चक्रव्यूहाचा भेद कर…, अभिमन्यूने क्षणभर विचार केला आणि सुहास्यवदनाने तो म्हणाला ‘तात’ मी अवश्य करेनच परंतु, मला एकच चिंता आहे आणि ती अशी की माझ्या पित्याने मला त्यातील अर्धाच भाग फक्त शिकवला आहे. व्यूहाचा भेद बंद करून आत गेल्यावर त्यातून बाहेर कसे यायचे ते मला ठाऊक नाही. याची मला काळजी आहे. यावर युधिष्ठिर म्हणाला, ‘वत्सा’, तू एकदा या व्यूहाचा भेद करुन आत शिरकाव कर. तुझ्या मागे आम्ही येऊ आणि सर्व व्यूह मोडून टाकू. इतकी महत्त्वाची कामगिरी आपल्या सोपवली गेली, याचाच अभिमन्यूला आनंद झाला. त्याला अभिमानच वाटला आणि या युद्धात काय झाले? अभिमन्यू मारला गेला हा इतिहास सर्वांनाच माहीत आहे.
    महाभारतातील हा संदर्भ विस्ताराने देण्या मागचे प्रयोजन म्हणजे औसा विधानसभा मतदार संघातील भाजपाचे तरूण आमदार, माजी मुख्यमंत्री व सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू निकटवर्तीय आमदार अभिमन्यु पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लेख लिहिण्यास संदर्भात इतिहासाची काही पाने चाळली असता अनेक किस्से, घटनांचा डोळ्यासमोर तरळला! त्यांच्या कोणत्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकावा असा विचार करत असताना एक तरुण, निष्ठावंत सच्या, दिलदार मित्राच्या लढाव्या बदल तळागाळात मिसळणारा रस्ते वाला आमदार, कार्यकर्त्याची मुस ओळखणारा मित्र म्हणून त्याच्या व्यक्तिरेखा वाचकाला कळाण्यात म्हणून हा लेख हा लेखनप्रपंच!
    आता अभिमन्यू पवार जीवन प्रवासाबद्दल थोडक्यात धांदोळा घेऊ यात….. अभिमन्यू दत्तात्रय पवार यांनी लातूरच्या दयानंद वाणिज्य महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी पूर्ण केली. नंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून वैयक्तिक व्यवस्थापनात पदवी घेतली. त्यांचे वडील दत्तात्रय पवार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. त्यामुळे बोलपणापासून अभिमान यावर संघाचे संस्कार झाले. संघ संस्कारात वाढलेले अभिमन्यू हे भविष्यात आमदार होतील, याची पुसटशीही कल्पना कोणाला नव्हती. राज्यात भाजपा-शिवसेना युतीचे सरकार सत्तेवर आले तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सूत्रे स्वीकारली. त्यावेळी देवेंद्रजी अभिमन्यू पवार यांना स्वीय सहाय्यक म्हणून काम करण्यास सांगितले. 2014 ते 2019 या कालावधीत त्यांनी देवेंद्रजीचे वैयक्तिक सहाय्यक म्हणून काम केले. देवेंद्रजीच्या आदेशावरून त्यांनी औसा विधानसभेची निवडणूक लढवली आणि औसा विधानसभा मतदार संघातून त्यांनी माजी मंत्री आणि काँग्रेसचे बस्वराज पाटील यांना पराभूत केले. एका वारकरी संप्रदायातील शेतकऱ्याचा प्राथमिक शाळेतील शिक्षकाचा मुलगा आमदार झाला हे अनेकांना न खुपणारे होते. या निवडीला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेला एक सामान्य कार्यकर्त्याला हरवण्यासाठी काही स्वकीयांनी आघाडीवर उतरून तर काहींनी बंडखोरांच्या पाठीशी उभे राहून अभिमन्यूला जंगजंग पछाडले. निवडणूक घोषित होण्यापूर्वी त्यांना तिकीट मिळू नये म्हणून केलेले प्रयत्न थयथयाट, सर्वांनाच माहित आहेच. मात्र अभिमन्यूने संयम ठेवत ‘चक्रव्यूह’ भेदण्याचा प्रयत्न केला. संघर्ष करीत आहेत… त्यामुळेच अभिमन्यूने चक्रव्युह भेदला का? असा लेखाचा मथळा देत त्यावर भाष्य करावे म्हणून हा लेखन प्रपंच!
    पक्ष म्हंटला की, गटबाजी, खेचाखेची, मतभेद, खच्चीकरण आलेच. भारतीय जनता पार्टी देखील त्याला अपवाद नाही. शिस्तप्रिय संघटन असलेल्या या पक्षात देखील गट-तट, राजकारण, खच्चीकरण आहे. याचा प्रत्यय पहावयास वारंवार मिळतो. परंतु यावर मात करण्यासाठी दाखवत आलेला संयम आणि कूटनीती यामुळे अभिमन्यु ‘चक्रव्यूह’ भेदण्यात काही अंशी तरी यशस्वी झाले असे म्हणता येईल.
    दुष्काळी तालुका म्हणून औसा तालुका ओळखला जात होता. मध्यंतरी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. यावेळी अभिमन्यू पवार यांनी आपल्या मतदारसंघात जाऊन शेती पिकांचे नुकसान समजावून घेतले होते. प्रत्येक गावा- गावातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला होता. बहुतांश लोकांना कोरोना झाला होता. त्यात अभिमन्यू सुटले नाहीत. कोरोनावर त्यांनी मात केली रुग्णालयातून बाहेर पडताच त्यांनी प्लाझमा दान करणार असल्याचे जाहीर केले. ते आपल्या मतदारसंघात पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे फिरतात. कोरोना काळातही त्यांनी आपला संपर्क कमी केला नाही. महाराष्ट्राला नव्हे तर देशाला पानंद रस्त्याचा आगळा-वेगळा पॅटर्न देण्याचे काम त्यांनी केले आहे. स्वतःच्या आमदार फंडातून शेत रस्ते तयार करून घेण्याचे काम त्यांनी केले. स्वतःचा आमदार फंड शेत रस्त्यासाठी खुला करून घेणारा, जो की असा वापरता येईल येत नाही. मात्र त्यांनी अत्यंत कसबीने हा फंड शासनाकडून मागून घेतला आणि प्रथमच सरकारने अशा कामांना हा फंड वापरता येतो असे सांगितले. औसा मतदार संघात जवळपास 600 किलोमीटर रस्ते करण्यात ते यशस्वी झाले. या पुढच्या टप्प्यात याच रस्त्याचे खडीकरण आणि त्यानंतर जे रस्ते 33 फुटाचे झाले आहेत त्या रस्त्याचे डांबरीकरण करण्याचा त्यांचा हा पॅटर्न शेतकऱ्यांच्या आयुष्यात नवी क्रांती घडवणारा ठरणार आहे.
    यासारखी कितीतरी कामे त्यांनी करून अनेकांची व पक्षश्रेष्ठींची मने जिंकली आहेत. असे असले तरी वाटेवर, काटे वेचीत चाललो…, याप्रमाणे आपल्या खडतर राजकीय प्रवासात या आधुनिक ‘अभिमन्यू’ चक्रव्यूह भेदण्यासाठी खूपच कष्ट घ्यावे लागतील. यासाठी त्यांनी तयारी करावी असे या निमित्ताने सुचवावेसे वाटते. त्यांच्या भावी वाटचालीस व वाढदिवसानिमित्त मनापासून शुभेच्छा!

गोपाळ कुळकर्णी
जेष्ठ पत्रकार
मो.9422071166

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here