अभिमन्यू पवारांनी औसा मतदारसंघाच्या विकासाचा अनुशेष भरून काढला – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आपला आशिर्वाद आ अभिमन्यू पवार यांच्या पाठीशी राहू द्या –
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन..
औसा व कासार सिरसी बसस्थानकांसह
२२ कोटींच्या विकासकामांचा लोकार्पण आणि ८७ कोटींच्या विकासकामांचा भूमिपूजन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न
औसा -( माध्यम वृत्तसेवा) :– सातत्याने पुर्ण पाठपुरावा व जनतेने दिलेले आशिर्वाद यामुळे आमदार अभिमन्यू पवार यांनी औशाच्या विकासाचा अनुशेष भरून काढला असून अशक्य वाटणारी कामेही त्यांनी पुर्ण करुन दाखवली आहेत. औसा शहराला सुमारे ५०० कोटींचा निधी दिला. किल्लारी सहकारी साखर कारखाना, शेतरस्ते, पांणद रस्ते, कासारसिरसी व किल्लारी अपर तहसील कार्यालय, किल्लारी भूकंपग्रस्तांचे रखडलेली कामे असतील आमदार अभिमन्यू पवार यांनी मार्गी लावली असून एका सामान्य कुटुंबातील मुलगा आमदार झाल्यास काय परिवर्तन होवू शकते हे मतदारसंघातील जनतेने अनुभवले असून येणाऱ्या काळातही आपला आशिर्वाद अभिमन्यू पवार यांच्या पाठीशी राहू द्या आम्ही तितक्याच ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
औसा व कासार सिरसी बसस्थानकांसह २२ कोटींच्या विकासकामांचा लोकार्पण आणि ८७ कोटींच्या विकासकामांचा भूमिपूजन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते (दि.१४) रोजी आॅनलाईन संपन्न झाले त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते की औसा मतदारसंघात विकासाचा मोठा अनुशेष होता भाजपातून एका सामान्य कार्यकर्त्याला तुम्ही निवडून दिले आणि विकासाचे परिवर्तन तुम्ही अनुभवत आहोत. अभिमन्यू पवार यांनी केलेली विकासाचे कामे विधीमंडळातील उत्तम कामगिरी हि त्याची जमेची बाजू आहे. त्यामुळे अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आपणास पाहायला मिळतात. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी औसा पाणीपुरवठयाची मागणी माझ्याकडे केली होती. आणि ती मंजुरीही केली आता प्रत्यक्षात पाणीपुरवठा योजना सूरू झाली आहे. त्यामुळे गतवर्षी कमी पाऊस पडूनही टॅकरची आवश्यकता भासली नाही.औसा शहरातील मुख्य रस्त्याचे केवळ भूमिपूजन व्हायचे पण आ अभिमन्यू पवार यांच्या कारकीर्दीत आम्ही निधी देऊन हि कामे पूर्ण केली. आता शहरात सार्वजनिक शौचालयांची कामे अंतिम टप्यात आहेत. औसा शहराला सुमारे ५०० कोटींचा निधी दिला. किल्लारी सहकारी साखर कारखाना, शेतरस्ते, पांणद रस्ते, कासारसिरसी व किल्लारी अपर तहसील कार्यालय, किल्लारी भुकंपग्रस्तांचे रखडलेली कामे असतील आमदार अभिमन्यू पवार यांनी मार्गी लावली त्यांच्या कारकीर्दीत औसा येथील उपजिल्हा रुग्णालयासाठी १०० कोटी मंजूर केले असून ते काम लवकरच सुरू होईल. मतदारसंघातील बेलकुंड येथे २५० हेक्टरवर एमआयडीसी मंजूर करून आम्ही थांबणार नाही तर तिथे उद्योग सुध्दा आणणार आहोत. या सर्व कामासाठी आ अभिमन्यू पवार यांनी केलेला सातत्याने पाठपुरावा आणि जनतेच्या आशिर्वादामुळे त्यांना यश एका सामान्य कुटुंबातील मुलगा आमदार झाल्यास काय परिवर्तन करू शकतो हे आपण अनुभवले असून येणाऱ्या काळातही आपण पुर्ण ताकदीने आमदार अभिमन्यू पवार यांच्या पाठीशी उभे राहावे आम्ही तितक्याच ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे आहोत अशी ग्वाही यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.यावेळी विविध विभागाचे अधिकारी व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते..
……………
३ हजार कोटीच्या विकास कामांचा टप्पा पुर्ण – आ अभिमन्यू पवार
यावेळी बोलताना आ अभिमन्यू पवार म्हणाले की मतदारसंघातील औसा, कासारसिरसी व लामजना येथे भव्य बसस्थानक उभारले असून औसा शहरातील बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित तिसरा टप्पा रस्ता रुंदीकरण व सुधारणा कामही पूर्ण झाले आहे. औसा शहरात सुमारे पाचशे कोटी रुपयांची विकास कामे पूर्ण होत असताना संपूर्ण मतदारसंघात ३ हजार कोटींचा विकास कामांचा टप्पा पुर्ण होत आहे. आणखी काही कामे कागदावर असून तीही पूर्ण होत आहेत.औसा शहरात विविध विकास कामे पूर्ण होत असताना औसा हे स्वच्छ, सुंदर व सुरक्षित शहर निर्माण करण्याचे आपले स्वप्न असून त्यासाठी जनतेची साथ आवश्यक आहे. तर वाढीव शहर पाणीपुरवठय़ाच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. याचबरोबर उद्योगाला चालना व रोजगार निर्मिती करण्यासाठी चांगले उद्योग येणाऱ्या काळात आणले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले.