नांदेड( वृत्तसेवा )-संगीतकार आनंदी विकास यांनी संगीतबद्ध केलेल्या विठ्ठलाच्या 25 अभंगाचे प्रसारण झी मराठी या प्रसिद्ध वाहिनीवरून अवघा रंग एक झाला या कार्यक्रमात 6 डिसेंबर पासून करण्यात झाले आहे.
आनंदी विकास यांनी आतापर्यंत ५००हून अधिक गीतांना संगीत दिले असून, त्यांनी संगीत दिलेल्या गीतांचे प्रसिद्ध गायक अजित कडकडे, सावनी रवींद्र, शंकर महादेवन महालक्ष्मी अय्यर, मंगेश बोरगावकर, आशाखाडिलकर ,अंकिता जोशी ,प्रियांका बर्वे, हृषिकेश रानडे यांच्या सह इतर अनेक प्रसिद्ध गायकांनी गायले आहे. आनंदी विकास यांचे 24 अल्बमही प्रसिद्ध झाले आहेत. राज्यातील नामवंत कवींच्या विठ्ठल भक्तीच्या रचनांना संगीत आनंदी विकास यांनी दिले आहे.

तसेच त्यांचे ऑनलाईन प्लैट फॉर्मवर २०० गाणी आहेत. झी मराठी या प्रसिद्ध वाहिनीने नुकतेच आनंदी विकास यांच्या विठ्ठल गीते विविध गायकांनी गायले आहे त्या गीतांचे चित्रीकरण सिन्नर जि.नाशिक येथील वामनदादा कर्डक या सुंदर सभागृहात करण्यात आले आहे. या गीताचे प्रसारण ६ डिसेंबरपासून पुढे सकाळी ७ ते ८ या वेळात होणार आहे.
या विठ्ठल गीतात डॉ. दिलीप पंडीत, डॉ. व्यंकटेश काब्दे, संजीव कोकीळ,राजेंद्र अत्रे, अमृत देशमुख, सुवर्णा मुळजकर, देवीदास फुलारी यांच्या काव्यरचनांना आनंदी विकास यांनी संगीत दिले आहे, प्रसिद्ध गायक मंगेश बोरगावकर, सचिन चंदात्रे, मृदुला तांबे, स्वराली जोशी, विश्वास अंबेकर या गायकांनी ही गीते गायली आहेत. तर आनंदी विकास, देवीदास फुलारी, सुवर्णा मुळजकर, पद्माकर कुलकर्णी, अविनाश शिंदे यांनी या गीतांचे निरूपण केले आहे. झी मराठीवरील अवघा रंग एक झाला या कार्यक्रमात या गीतांचे प्रसारण होणार आहे.
झी मराठी सारख्या मोठ्या वाहिनी वर एकसंघ एवढी गाणी चित्रित होऊन ती प्रसारित होणे ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.
हा सन्मान आनंदी विकास यांना मिळाला आहे म्हणजे तो नांदेडला मिळाल्या सारखा आहे..