इचलकरंजी : प्रतिनिधी
इचलकरंजी येथील सरस्वती हायस्कूलचा विद्यार्थी आदित्य विनायक फातले याने घराला आर्थिक हातभार लावण्यासाठी भाजी विक्रीचा व्यवसाय करत दहावी परीक्षेत चांगली बाजी मारली आहे.त्याने अगदी जिद्दीने
तब्बल ९९.६० टक्के गुण मिळवत यशाला गवसणी घातली आहे.
येथील सरस्वती हायस्कूलमध्ये दहावीत शिकणारा आदित्य विनायक फातले हा आपल्या आई – वडीलांना फळ – पालेभाजी विक्री करण्याच्या कामात नियमित मदत करतो.तसेच त्याने अगदी जिद्दीने प्रयत्नात सातत्य ठेवून नियमित अभ्यासावर देखील मोठा भर दिला होता.त्याचेच फलित म्हणजे दहावी परीक्षेत त्याला तब्बल ९९.६० टक्के गुण मिळाले आहेत.त्याचे हे यश अनेकांसाठी प्रेरणा देणारे ठरले आहे.
यासाठी त्याला सरस्वती हायस्कूलचे सर्व शिक्षक ,आई – वडीलांचे चांगले मार्गदर्शन लाभले.
त्याच्या या यशाबद्दल त्याचा वर्चस्व युवा फौंडेशनच्या वतीने सत्कार करुन त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी फौंडेशनचे उत्तम चौगुले ,विजय चव्हाण , विश्वनाथ जाधव ,राजू राठोड ,तोफिक कोठीवाले ,सूरज पाटील यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.