लातूर जिल्ह्यात आता वृक्ष लागवड चळवळीने मुळ धरले – जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.
लातूर,(जिमाका)दि.29:- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मांजरा नदी दुतर्फा वृक्ष लागवड मोहिमेने दाखवून दिले की, लातूरमध्ये मोठं स्पिरीट आहे. आता वृक्ष लागवड ही सर्वसामान्यांची चळवळ होत आहे. वृक्ष लावून नाही, तर ते जगवून मोठे करेपर्यंतचे दायित्व आपले आहे, अशी भावना प्रत्येक घटकामध्ये निर्माण होत आहे. या माहिमेचा उद्देश उर्जा पेरणे हा होता, ती प्रेरक उर्जा आता थांबणार नाही. तावरजा, तेरणा नदीच्या काठावरही दुतर्फा वृक्ष लागवड सर्वांच्या सहभागाने साकार होणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी आज केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्वांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच या कृतीशील सहभागाकरिता स्मृती चिन्ह, गौरव प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला. त्या सोहळ्यात जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी माजी आमदार पाशा पटेल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, उपजिल्हाधिकारी नितीन वाघमारे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, ट्रॅव्हल्स एजन्सीचे मालक, स्वंयसेवा संस्थेचे पदाधिकारी, समन्वय करणारे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्यावतीने प्रत्येक गावात मियावाकी आणि बिहार पॅटर्नने वृक्ष लागवड होईल. आपण आता लातूरचे स्पिरीट बघून भारावून गेलो, असून ते स्पिरीट आता माझ्यातही आल्याची भावना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी व्यक्त केली.
माजी आमदार पाशा पटेल यांनी आपण येथून पुढे जिल्ह्याच्या वृक्ष चळवळीसाठी समर्पित भावनेने काम करणार असल्याची भावना व्यक्त केली.
जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील तसेच विविध संस्थांच्या प्रतिनिधीने प्रतिनिधिकपणे मनोगत व्यक्त केले.
राजर्षी शाहू महाविद्यालय, दयानंद कला, वाणिज्य, विज्ञान आणि विधी महाविद्यालय, महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, विवेकानंद महाविद्यालय, त्रिपुरा महाविद्यालय, श्रीमती सुशीलादेवी देशमुख महाविद्यालय, चन्ना बसवेश्वर महाविद्यालय, कै. वेंकराव देशमुख महाविद्यालय, बाभळगाव, जयक्रांती महाविद्यालय लातूर, केशवराज विद्यालय, देशीकेंद्र विद्यालय, कमाला नेहरू विद्यालय, बोरी, शिवाजी महाविद्यालय, शिवणी बु., राजर्षी शाहू विद्यालय, बोरी यांनी वृक्षलगवडीत सहभाग घेतला याबद्दल गौरव करण्यात आला. लातूर वृक्ष चळवळ, ग्रीन लातूर वृक्ष टीम, सह्याद्री देवराई, आर्ट ऑफ लिव्हिंग, आधार फाऊंडेशन, आम्ही मावळे शिवबाचे, रोटरी मिडटाऊन, लातूर सायकलिस्ट क्लब, वसुंधरा प्रतिष्ठान या विविध संस्थानी उत्स्फूर्त सहभाग घेऊन प्रेरणादायी काम केले त्यांचाही गौरव करण्यात आला.
लातूर तालुक्यातील भातखेडा, सोनवती, धनेगाव, शिवणी खुर्द, भातांगळी, भाडगाव, रमजानपूर, उमरगा, बोकनगाव, सलगरा ( बु. ), बिंदगीहाळ तर औसा तालुक्यातील शिवणी बु, तोंडवळी, होळी या चौदा गावात वृक्ष लागवड करण्यात आली. त्या सर्व ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात आला.
प्राथमिक शाळा कासारखेडा, चिकलठाणा, बामणी, प्रशाला भातांगळी, श्रीराम विद्यालय कासारखेडा, जय भवानी विद्यालय बामणी ,मातृभूमी विद्यालय भातांगळी या शाळेतील सर्व शिक्षक भातांगळी येथे तसेच प्रा. शा. खुलगापूर, मळवटी, कासारगाव, कोळपा, हनमंतवाडी, सकपाळ नगर, भातखेडा, छत्रपती शिवाजी विद्यालय मळवटी, राजमाता सुशीला देवी विद्यालय महाराणा प्रताप नगर या शाळेतील सर्व शिक्षक भातखेडा यांनाही स्मृती चिन्ह आणि प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
विश्व ट्रॅव्हल्स, तेजस ट्रॅव्हल्स, चौधरी ट्रॅव्हल्स, मानसी ट्रॅव्हल्स, अमृता ट्रॅव्हल्स, राधिका ट्रॅव्हल्स, रयिालिंक ट्रॅव्हल्स, पुष्कराज ट्रॅव्हल्स, रुद्राक्ष ट्रॅव्हल्स, श्री. श्री. रविशंकर विद्यामंदिर, पोलिस प्रशिक्षण केंद्र बाभळगांव, गोल्डक्रेस्ट हाय, अंकूर बालविकास केंद्र, पोदार इंटरनॅशनल स्कूल, किडीझ इन्फो पार्क पेठ, माऊंट लिटरा झी स्कूल, बसवनप्पा वाले न्यु इंग्लिश मेडियम स्कूल, लातूर या वाहतूक सेवा पुरविणाऱ्या संस्थांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी नितिीन वाघमारे यांनी केले तर सूत्रसंचालन नायब तहसीलदार महेश सावंत यांनी केले.