वाढदिवसानिमित्त शालेय उपयोगी साहित्याची भेट..
औसा -( वृत्तसेवा )आमदार अभिमन्यू पवार यांचा (दि.१) जुलै रोजी वाढदिवस होता. त्यानिमित्ताने वाढदिवसानिमित्त सहकार, सामाजिक, राजकीय, साहित्य, कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रांतील अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून त्यांना शुभेच्छा दिल्या.लातूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे पदाधिकारी, व्यापारी व उद्योजक यांच्यासह सर्वच क्षेत्रांतील घटकांनी प्रत्यक्ष भेटून आमदार अभिमन्यू पवार यांना शुभेच्छा दिल्या.

औसा मतदारसंघात गेल्या साडेचार वर्षात केलेल्या विकास कामातून जनसामान्यात आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवून अल्पावधीत औसा मतदारसंघाची ओळख संपूर्ण राज्याला आ अभिमन्यू पवार यांनी करून दिली आहे.विकास कामासोबत सर्व सामान्य लोकांची त्यांच्या कामातून मने जिंकून त्यांनी विकासासोबत माणसे जोडण्याची कामे केली आहेत.याचेच फलित म्हणून त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर लोकांसह शेतकरी, शालेय विद्यार्थीसह अगदी तांडा-वस्तीवरून लोकांनी गर्दी केली होती.
सोमवारी सकाळपासून औसा येथील मुक्तेश्वर मंगल कार्यालयात ते जनतेच्या शुभेछा स्विकारण्यासाठी उपस्थित होते.याप्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या लोकांना हारतुरे ऐवजी शालेय उपयोगी साहित्य देण्याचे आवाहन त्यांनी केले होते.या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.आ अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या या उपक्रमाअंतर्गत औसा विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय उपयोग साहित्याचे वाटप करण्यात आले.आ अभिमन्यू पवार हे प्रतिवर्षी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने लोकोपयोगी साहित्याचे वाटप करण्याचे आवाहन करीत असतात याला मोठा प्रतिसाद मिळत असतो. याही वर्षी या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
आपल्या संकल्पनेतून व कार्यतत्परतेतून आ अभिमन्यू पवार यांनी अवघ्या साडेचार वर्षात विकास कामातून मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलून टाकण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.दरम्यान सोमवारी सकाळपासूनच आ अभिमन्यू पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी मतदारसंघातील नागरिकांनी गर्दी केली होती.तर राज्यभरातून विविध पक्षातील, सामाजिक संघटनेतील मान्यवर लोकांनी फोनव्दारे आ अभिमन्यू पवार यांना शुभेच्छा दिल्या...

माध्यम वृत्त समूहाचे संपादक गोपाळ कुळकर्णी यांनी औसा येथे आमदार अभिमन्यू पवार यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पवार यांनी सामाजिक भान राखत वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा केला, याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले.